महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची परीक्षा घेण्यात येते. हि परीक्षा एकूण ८० गुणांची (Marks) असून यात ५ गुणांसाठी रिकाम्या जागा (MCQ Questions) असतात.
यांचा अभ्यास करणे सोपे असते शिवाय हे ५ गुण हक्काचे असतात. प्रत्येक पाठच्या शेवटी पाठातील महत्वाच्या (Important) रिकाम्या जागा (MCQ) सोडवण्यासाठी दिलेल्या असतात. अशाच महत्वाच्या रिकाम्या जागा प्रश्नसंच (Important MCQ Questions) येथे उपलब्ध करून देत आहोत.
या रिकाम्या जागा महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी च्या बोर्डाच्या परीक्षेकरिता (10th std SSC Board) उपयुक्त आहेत. atamarathi.in या ब्लॉग वर १० वीच्या वर्गाकरिता रिकाम्या जागा (mcq questions for class 10), सर्व विषयांचे MCQ प्रश्न उपलब्ध आहेत (questions of all subjects)
इयत्ता १० वी च्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – १ (Science and Technology Part – 1) या पुस्तकातील काही महत्वाच्या (Important) रिकाम्या जागा कोणत्या आहेत ते अभ्यासणार आहोत.
इयत्ता १० वी च्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – १ (Science and Technology Part – 1) पुस्तकात एकूण १० प्रकरणे आहेत. त्यावर आधारित MCQ Questions अभ्यासन्यापुर्वी पाठाची नावे बघू.
पाठाचे नाव
- गुरुत्वाकर्षण
- मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
- रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
- विद्युतधारेचे परिणाम
- उष्णता
- प्रकाशाचे अपवर्तन
- भिंगे व त्यांचे उपयोग
- धातूविज्ञान
- कार्बनी संयुगे
- अवकाश मोहिमा
असे एकूण १० पाठ असून प्रत्येक पाठावरील रिकाम्या जागांचे प्रश्न (Multiple choice Questions) आपण येथे सोडवून बघणार आहोत.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. (choose the right answer and complete the sentence) (MCQ)
१. गुरुत्वाकर्ष्णाचा शोध ………………… यांनी लावला.
> सर आयझाक न्यूटन
२. अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रोनची संख्या …………….. आहे.
> १
३. अल्क धर्मी मृदा धातूंची संयुजा २ आहे. म्हणजे त्यांची आधुनिक अवर्त्सार्नीतील जागा ……… आहे.
>गण २
४. मूलद्रव्य X च्या क्लोराईडचे रेनुसुत्र XCl आहे. हे संयुग उच्च द्रवनांकअसलेला स्थायू आहे. X हे मूलद्रव्य आवर्त सारणीच्या ज्या गणात असेल त्या गणात पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असेल ?
>
४.आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत ?
>P खंड
५. सेंद्रिय कचरा सूक्ष्म जीवांमार्फत विघटन पावून ……….. तयार होतात.
>खत व जैविक वायू (Biogas)
६. लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हनुन त्यांच्यावर …………. धातूचा थर दिला जातो.
> जस्त
७. फेरस सल्फेट चे फेरीक सल्फेट मध्ये रुपांतर हि एक ……………. अभिक्रिया आहओक्सिडीकरण
>ओक्सिडीकरण
८. आम्लयुक्त पाण्यातून विद्युतप्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे ………………… होते.
>विद्युत अपघटन
९. BaCl2 च्या जलीय द्रावणात ZnSO4 जलीय द्रावण मिसळणे हे ………………… अभिक्रियेचे उदाहरण आहे.
>दुहेरी विस्थापन
१०. विद्युत शक्तीचे एकक ……………………. हे आहे.
>w (watt)
११. विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे नियम …………. यांनी शोधून काढले.
>मायकेल फेराडे (Michael Faraday)
१२. उष्णतेचे SI पद्धतीतील एकक …………….. आहे.
>ज्युल (J)
१३. ………… हे उष्णतेचे CGS मापन पद्धतीतील एकक आहे.
>कॅलरी (Cal)
१४. हवेतील पाण्याचे प्रमाण ज्या राशीच्या सहाय्याने मोजले जाते तिला …………….. म्हणतात.
>निरपेक्ष आर्द्रता
१५. समान वस्तुमान असलेल्या वेगवेगळ्या पदार्थास समान उष्णता दिली असता त्यांचे वाढणारे तापमान त्यांच्या ………………………. गुणधर्मांमुळे समान नसते.
>विशिष्ठ उष्माधारकता
इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी च्या विज्ञान आणि तंत्रज्ञान – भाग १ व २ करिता प्रत्येकी ४० गुणांची प्रश्नपत्रिका तयार करण्यात येते. यामध्ये पहिल्या प्रश्नाचे (अ) व (ब) २ भाग करून यात बहु पर्यायी (MCQ- Multiple Choice Question) पद्धतीनुसार प्रश्न विचारले जातात.
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – १ मध्ये रसायन शास्त्राचा समावेश करण्यात आला असून रासायनशास्त्रावर आधारित महत्वाचे MCQ प्रश्न विचारले जातात.
खालील विधानातील रिक्त जागा भरा. पूर्ण झालेली विधाने पुन्हा लिहा (Fill in the Blanks then rewrite the sentence)
१६. माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर ……………….. अवलंबून असतो.
>अपवर्तनांक
१७. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृत्थक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे ………….. म्हणतात.
>अपस्करण
१८. प्रकाशाच्या पुढे जाण्याच्या ……………….. वर अपवर्तनांक अवलंबून असतो.
>वेगावर
१९. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना ……………. बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस अपवर्तन म्हणतात.
>मार्गक्रमणाची दिशा
२०. वैद्यकीय उपकरणांमध्ये …………….. किरणांचा वापर केला जातो.
>लेझर
२१. सूक्ष्मजीव आणि सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी………….. च वापर केला जातो.
>संयुक्त सूक्ष्मदर्शी
२२. अधातुना ……………… मूलद्रव्ये म्हणतात.
>विद्युतऋण
२३. …………….. व ………………. हि व्यापारी महत्व असणारी दोन कार्बनी संयुगे आहेत.
>इथेनॉल, एथेनोइक असिड
२४. इथिलीन (Ethylene) चे रचना सूत्र ……………….
>CH2=CH2
२५. कृत्रिम उपग्रहाच्याभ्रमणकक्षेची भूपृष्ठापासून उंची वाढविल्यास त्या उपग्रहाचीस्पर्श रेषेतील गती …………….. होते.
>कमी
२६. मंगळयानाचा सुरुवातीचा वेग हा पृथ्वीच्या ………………. पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
>मुक्तीवेगापेक्षा
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – 2 (Science and Technology Part – 2) हा भाग जीवशास्त्र (Biology) जीवशास्त्र (Zoology), सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान (BioTechnology) या विषयांचा समावेश करण्यात आला आहे आता त्यावर आधारित Multiple choice questions (MCQ) अभ्यासू.
- MCQ Questions with answers
- MCQ Questions for Class 10
- 10th Science MCQ Solutions
२७. आधुनिक अनुवान्शिकीचा प्रारंभ …….. यांनी केला.
>ग्रेगर जोहान मेंडेल
२८. अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण भाव ह्युगो टू र्व्हीस यांच्या ………….. सिद्धांतामुळे लक्षात आला.
>उत्परिवर्तन
२९. प्रथिनांची निर्मिती ___________ मार्फत घडून येते हे जॉर्ज बिदाल व एडवर्ड तेतम यांनी दाखवून दिले.
>जनुक
३०. DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठविण्याची प्रक्रिया म्हणजे …………. म्हणतात.
>प्रतीलेखन
३१. उत्क्रांती म्हणजेच ……………… होय.
>क्रमविकास
३२. मानवी शरीरात आढळणारे _________ हे उत्क्रांतीचा अवशेशांगात्मक पुरावा होय.
>आंत्रपुच्छ
३३. एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ओक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण _______ रेणू मिळतात.
>३८
३४. ग्लायाकोलीसिसच्या शेवटी ____________ चे रेणू मिळतात.
>पायारुवेट
३५. अर्धसुत्री विभाजन भाग – १ च्या पूर्वा वस्थेतील ______________ या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते.
>स्थूलसुत्रता
३६. सूत्री विभाजनाच्या _______ अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात.
>मध्यावस्था
३७. पेशीचे द्रव्यपटल तयार करण्यासाठी ___________ च्या रेणूची आवश्यकता असते.
>फोस्फोलीपिड
३८. आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ____________ प्रकारचे श्वसन करतात.
>विनॉक्श्विसन
३९. मानवी शुक्रपेशींची निर्मिती ________ या अवयवात होते.
>वृषण
४०. मानवामध्ये ________ हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते.
>Y
४१. पुरुष आणि स्त्री जनन संस्थेमध्ये _________ ग्रंथी समान असतात.
>गोंडस
४२. भृणाचे रोपण _________ या अवयवामध्ये होते.
>गर्भाशय
४३. भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय ____________ हे प्रजनन घडून येते.
>अलैंगिक
४४. शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो हे प्रजनन __________ प्रकारचे आहे.
>खंडीभवन अलैंगिक
४५. परागकोशातील कोष्टकांमध्ये ____________ विभाजनाने परागकण तयार होतात.
>अर्धसुत्री
४६. ज्या प्रजातींची संख्या अत्यंत कमी उरलेली असते अशा प्रजातींना ________ म्हणतात.
>संकटग्रस्त प्रजाती
४७. एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे __________ विविधता होय.
>आनुवंशिक विविधता
४८. विद्युत निर्मिती केंद्रामध्ये वीजनिर्मितीसाठी _______ वापरतात.
>मोठी विद्युत जनित्रे
४९.असमपृष्ठरज्जू प्राण्यांच्या शरीरामध्ये _________ नावाचा अधारक नसतो.
>पृष्ठरज्जू
५०. प्राण्यांचे शरीर _______ पासून तयार झालेले आहे.
>पेशींपासून
५१. दुध स्रवणाऱ्या ग्रंथी असणे हा ______ प्राण्यांचा विशिष्ट गुणधर्म आहे.
>सस्तनी
५२. लाक्टिकआम्लामुळे दुधातील प्रथिनांचे __________ होण्याची क्रिया घडते.
>क्लथन
५३. प्रोबायोटिक्स खाद्यांमुळे आतड्यातील ___________ सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो.
>क्लोस्ट्रिडियम
५४. रासायनिक दृष्ट्या विनेगर म्हणजे _____ होय.
>असेटिक आम्ल
५५. काल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार _______ आम्लापासून बनवितात.
>ग्लुकोनिक आम्ल
५६. गर्भ ज्या नाळेने जोडलेला असतो त्या नाळेमध्ये ___________ पेशी असतात.
>मुलपेशी
५७. कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने __________ केला जातो.
>पशुसंवर्धनासाठी
५८. _________ हि जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंग नंतरची क्रांतिकारी घटना होय.
>मुलपेशी संशोधन
५९. इन्शुलीन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ______ होय.
>मधुमेह
६०. ___________ या व्यवसायाला भारत सरकारने NKM १६ या कार्यक्रमाद्वारे उत्पादनवाढीकरिता प्रोत्साहन दिले आहे.
>मत्स्यशेती
६१. हास्य मंडळ हा ________ दूर करण्याचा एक उपाय आहे.
>ताणतणाव
६२. मद्य सेवनाने मुख्यतः__________ संस्थेला धोका पोहोचतो.
>चेता
६३. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ______ हा कायदा आहे.
>माहिती तंत्रज्ञान कायदा २०००
६४. ____________ हा आपत्कालीन उपाययोजना आणि राष्ट्रीय प्रगती यांच्यातील महत्वाचा दुवा आहे.
>पुनरुत्थापन
६५. सुर्यफुल हे युरेनियम व __________ धातू शोषून घेतो.
>अर्सेनिक
- MCQ Questions for class 10 Science with answers
- इयत्ता १० वी करिता उपयुक्त असे विविध विषयांचे अपेक्षित प्रश्नसंच
- MCQ प्रश्नसंच व महत्वाचे बोर्डाचे प्रश्न
अधिक वाचा :
इयत्ता १० वी ची pdf स्वरुपात पुस्तके
maharashtra state board 10th(SSC) and 12th (HSC) exam time table 2023