capital of India : Delhi

what is capital of india ? | भारताची राजधानी कोणती? असे म्हणताच दिल्लीचे इंडिया गेट (India Gate) डोळ्यासमोर येते. पण यापूर्वी भारताची राजधानी कोणते शहर होते हे आपल्याला विचारल्यावर आठवत नाही, चला तर मग मित्रांनो जाणून घेऊन भारताच्या राजधान्यांचा इतिहास (History of Capital’s of india ).

capitals-of-india

History of India’s Capitals | भारताच्या राजधान्यांचा इतिहास

भारत देशाच्या निर्मितीपासून ते आतापर्यत भारताची राजधानी म्हणून अनेक शहरांची निवड केली गेली काही विशिष्ट काळापर्यंत ती शहरे भारताची राजधानी म्हणून ओळखली गेली.

६ व्या शतकापासून भारत देश वेगवेगळ्या नावानी ओळखला जात होता.स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात अनेक राजे होऊन गेले त्यांच्या काळातील राजधानीची शहरे पाहूयात.

Ancient Capitals of India

  • चोल राजांच्या राजवटीत तंजावर व गांगैकोंडा चोलापुरम हे शहर राजधानीचे शहर म्हणून ओळखले जात होते.
  • मौर्य राजांच्या कार्यकाळात मौर्यांची राजधानी पाटलीपुत्र हे शहर होते.
  • पल्लव राजांच्या काळात कांची हे राजधानीचे शहर उदयास आले.
  • पंड्य राजांनी मदुराई शहराला आपले राजधानीचे शहर म्हणून घोषित केले.
  • चालुक्यांनी राजधानीचे शहर म्हणून वतापी या शहराची निवड केले या शहरास अजून बदामी या नावानेही ओळखले जाते.
  • त्यानंतरच्या चालुक्य राजांनी कल्याणी या शहराची निवड राजधानीचे शहर म्हनून केली.
  • काकतीय राजांनी वारंगल शहर राजधानी म्हणून निवडले.
  • सातवाहन राजांच्या राजवटीत सातवाहनानी प्रतिष्ठान (आताचे महाराष्ट्रातील पैठण ) राजधानी म्हणून निवडले.
  • बहामनी राजवटीत प्रथमतः गुलबर्गा (एहासानाबाद) व नंतर बिदर (मुहम्मदाबाद) अशा दोन राजधान्या निवडल्या.
  • वर्मन काळात प्रगत्ज्योतीशपुरा हे राजधानीचे शहर होते त्यास आता गुवाहाटी म्हणून ओळखले जाते.
  • शुंग राजांनी पाटलीपुत्र व नंतर विदिशा या शहरास राजधानीचे शहर म्हणून घोषित केले.
  • राष्ट्रकुट राजांच्या काळात माण्यखेता हे राधानीचे शहर होते.
  • सोलंकी राजवटीत अन्हीलबारा शहर हे राजधानीचे शहर होते.
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची निवड केली होती.
  • टिपू सुलतानाने श्रीरंगपट्टनम येथे राजधानी स्थापन केली.
  • रणजीतसिंहाच्या कार्यकाळात आता सध्या पाकिस्तानात असणारे लाहोर शहर हे राजधानीचे शहर होते.
  • हर्षवर्धन राजाच्या राजवटीत सुरवातीला ठानेसर व नंतर कनोज हि शहरे राजधानीचे शहरे होती.
  • कनिश्क राजाच्या काळात पुरुश्पुरा हे शहर राजधानीचे शहर होते.

एक दिवसाची राजधानी | Capital of India for one day

१८५८ साली अल्लाहाबाद म्हणजे आताच्या प्रयागराज हा शहराला एका दिवसासाठी भारताचे राजधानीचे शहर (capital) बनविण्यात आले होते.

भारताचा नकाशा – राज्य व राजधानीचे शहर | India Map with States and their capital city

india-map-in-marathi

(Image sourse : Maps of india)

भारताची राजधानी कलकत्ता वरून दिल्लीला कोणी नेली ?

लॉर्ड होर्डिंग यांनी भारताची राजधानी कलकत्ता वरून दिल्लीस हलविली.

         जेव्हा ब्रिटीश भारतात आले तेव्हा सुरवातीच्या काळात ब्रिटीश राजवट काळात १९११ पर्यंत कलकत्ता (कोलकाता) हि भारताची राजधानी होती. १९ शतकाच्या शेवटी शेवटी शिमला शहरास भारताची ग्रीष्मकालीन राजधानी बनवण्यात आले.

जॉर्ज पंचम (King George 5) याने दिल्ली शहराला भारताची राजधानी म्हणून घोषित केले पण अखेर १३ फेब्रुवारी १९३१ ला दिल्ली शहराला राजधानीचे शहर (capital city) म्हणून घोषित करण्यात आले.

कोलकात्यामधील राजकीय वातावरण बिघडल्यामुळे दिल्लीला राजधानीचे शहर बनविण्यात आले पण त्याचबरोबर दिल्लीमधील भौगोलिक परिस्थितीही तेवढीच कारणीभूत होती.

State and Capitals of India | भारत्तातील राज्य आणि त्यांच्या राजधानी ची शहरे

राज्यराजधानी
आंध्र प्रदेशअमरावती
आसामगुवाहाटी
बिहारपटना
कर्नाटकबँगलोर
केरळतीरुवन्तपुरम
मध्य प्रदेशभोपाळ
ओडिशाभुवनेश्वर
राजस्थानजयपूर
तमिळनाडूचेन्नई
उत्तर प्रदेशलखनऊ
पश्चिम बंगालकोलकाता
महाराष्ट्रमुंबई
गुजरातगांधीनगर
नागालँडकोहिमा
पंजाबचंदिगढ
हरियाणाचंदिगढ
हिमाचल प्रदेशशिमला
मेघालयशिलांग
मणिपूरइंफाळ
त्रिपुराआगरतळा
सिक्कीमगंगटोक
अरुणाचल प्रदेशइटानगर
मिझोरमएझवाल
गोवापणजी
छत्तीसगडरायपुर
उत्तरांचलडेहराडून
झारखंडरांची
तेलंगनाहैदराबाद

भारतात एकूण  केंद्रशासित प्रदेश (Union Territories) आहेत त्यात जम्मू काश्मिर आणि लडाख हे दोन नव्याने निर्माण करण्यात आलेले केंद्रशासित प्रदेश आहेत.

Current Capital of india | भारताची सध्याची राजधानी

          भारताची स्वातंत्र्या नंतर दिल्ली हि राजधानीचे शहर म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आली, दिल्ली शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून स्वातंत्र्यापूर्वी दिल्ली मधून अनेक राजांनी राज्य केले,

दिल्ली शहर हे संरक्षणाच्या दृष्टिनेही चांगले असून दिल्लीला बारा दरवाज्यांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. दिल्ली शहराचा उल्लेख महाभारतातही आढळतो त्याकाळी पांडवांची राजधानीचे शहर होते त्यावेळी दिल्लीला इंद्रप्रस्थ म्हणून ओळखले जात असे.

Capital-of-india-map
History of Delhi| दिल्लीचा इतिहास

                  पूर्वेला यमुना नदी व पश्चिम आणि दक्षिण दिशेला अरवली पर्वत रांगेने वेढलेले दिल्ली शहर प्राकृतिक दृष्ट्याच नाही तर औद्योगिक दृष्टीनेही  परिपूर्ण आहे,भारतातील सर्वात जास्त लघु उद्योग आय टी क्षेत्र, हातमाग, कापड आणि इलेक्ट्रोनिक उद्योग इथे चालतात.

दिल्ली हे शहर संस्कृती दृष्ट्या वैविध्यपूर्ण असून या शहराच्या सीमा हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि पंजाब अशा चार राज्यांना जोडतात, त्यामुळे येथे विविध जाती, धर्म आणि पंथाचे लोक पाहायला मिळतात त्यामुळे दिल्ली हे एक सांस्कृतिक शहर म्हणूनही ओळखले जाते.  एवढे असूनही सर्वधर्म एकता पाहायल मिळते.

Delhi Today | आजची दिल्ली

                   आज दिल्ली जास्त लोकसंखेच्या घनतेचे शहर असले तरी दिल्ली सर्वांच्याच परिचयाची आहे, हिंदी,मराठी सिनेसृष्टीने तर दिल्ली शहरावर अनेक चित्रपटही बनविले आहेत जसे , New Delhi Times, Delhi-6, Chalo dilli, Delhi Safari, New Delhi, Dilli 1984 इ.

इतकेच नव्हे तर गल्ली ते दिल्ली, हे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले, दिल्ली विषयी अनेक खास गोष्टी आहेत जसे दिल्लीतील विविध वास्तू वास्तुकलेचे उत्तम उदाहरणे आहेत उदा. इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, लाल किल्ला, कुतुब मिनार,लोटस टेम्पल, जामा मश्जीद, अक्षरधाम मंदिर या वास्तू पर्यटकांना विशेष आकर्षित करतात.

          दिल्लीमध्ये विविध प्रकारची संग्रहालये (Museum) पाहायला मिळतात त्यात पर्यटकांना विशेष आकर्षित करते ते म्हणजे  National Museum, National Science Centre Delhi, Sulabh National Museum of Toilets, Metro Museum, National Police Museum येथे पर्यटकांची विशेष गर्दी पाहायला मिळते.

               गुगल वर  दिल्लीविषयी सर्वात जास्त सर्च केले जाते यामध्ये Capital of India, Delhi weather (दिल्लीचे हवामान) मागील काही वर्षांपासून दिल्ली तिच्या वायुप्रदुशनामुळे (Delhi air pollution) विशेष चर्चेत राहिली आहे. राजधानी दिल्लीतली हवा दिवसेंदिवस प्रदूषित आणि विषारी (Hazardous) बनत चालली आहे.

Air Quality Index (AQI) च्या सर्वेक्षणानुसार दिल्लीतील आनंद विहार ची हवा इतकी प्रदूषित आहे कि तिचा AQI ४२६ आहे, दिल्लीतील वायुप्रदूषण (Air Pollution) हि समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे, जर तुम्ही दिल्लीत राहत असाल तर  Real time air Quality Check करण्यासाठी तुम्ही https://aqicn.org/city/delhi/ ला भेट द्या व रोजची हवेची गुणवत्ता तपासून पहा.

World Health Organization (WHO) च्या पुढील व्हिडीओ मध्ये दाखविण्यात आले आहे कि वायुप्रदुशनाचे  मानवी आरोग्यावर किती हानिकारक परिणाम होतात.

 How air pollution impacts your body video