Online आधार कार्ड दुरुस्ती कशी करावी ?
- update aadhar address online
- aadhar card mobile number update
आधार कार्ड दुरुस्तीसाठी आता आधार केंद्राला (Aadhaar Center) ला भेट देण्याची गरज नाही, आता तुम्ही आपल्या मोबाईल फोन किंवा laptop वर घरी बसल्या आपले आधार कार्ड दुरुस्त करून आपला Time आणि पैसे (Money) वाचवू शकतो. आधार कार्ड दुरुस्ती (UPDATE) करण्यासाठी आधार चे अधिकृत संकेतस्थळ uidai.gov.in याला भेट द्या.
त्यापूर्वी आपण हे बघुयात कि आपल्याला आधार कार्ड दुरुस्ती साठी कोणती कागदपत्रे (Documents) लागतात ते बघू .
आधार कार्ड सुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे
Required Documents for Aadhaar Card Update
POI (Proof of identity) ओळखीचा पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे
- Passport (पासपोर्ट)
- Pan Card / e-pan (पॅन कार्ड/इ-पॅन)
- Ration/PDS Card (रेशन /pds कार्ड)
- Voter ID/ e – Voter ID (मतदान ओळख पत्र/ इ-मतदान ओळख पत्र)
- Photo Bank Passbook / ATM Card (बँकेचे पासबुक / एटीएम कार्ड)
- Marriage Certificate with Photograph (फोटो असलेले विवाह नोंदणी दाखला)
- ST/SC/OBC Certificate with Photograph (ST/SC/OBC जातीचे प्रमाणपत्र)
DOB (Proof of Birth) जन्म तारीखेचा पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे
- Birth Certificate (जन्म प्रमाणपत्र)
- Passport (पास पोर्ट)
- Pan Card / e-pan (पॅन कार्ड/इ-पॅन)
- Photo ID card having Date of Birth, issued by Recognized Educational Institution (शाळा/महाविद्यालयाचे ओळखपत्र)
- Marksheet issued by Any recog. govt. Board or University (शासकीय नामाकीत विद्यापीठ / बोर्डाचे गुणपत्रक)
- School Leaving Certificate (शाळा सोडल्याचा दाखला)
POA (Proof of Adress) रहिवासाचा पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे
- Passport (पास पोर्ट)
- Ration Card (रेशनकार्ड)
- Voter ID/ e – Voter ID (मतदान ओळख पत्र/ इ-मतदान ओळख पत्र)
- Photo ID card having Date of Birth, issued by Recognized Educational Institution (शाळा/महाविद्यालयाचे ओळखपत्र)
- School Leaving Certificate (शाळा सोडल्याचा दाखला)
- Marriage Certificate with Photograph (फोटो असलेले विवाह नोंदणी दाखला)
वरील कागद पत्रांपैन्की ज्यात बदल करायचा आहे त्या आवश्यकतेनुसार कागदपत्र अपलोड करावे.
आधार कार्ड Online पद्धतीने Update कसे करावे
आधार कार्ड अपडेट करण्याकरिता पुढे दिलेल्या Steps प्रमाणे अपडेट करा.
१. आधार चे अधिकृत संकेतस्थळ uidai.gov.in वर जा. सर्वात आधी पुढीलप्रमाणे Window उघडेल.
२. तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा
३. पुढील Window ओपन झाल्यावर My Aadhaar Dropdown मेनू मधून Download Aadhaar वर क्लिक करा.
४. वरील Log in Window उघडल्यावर Log in वर क्लिक करा.
५. तुमचा आधार क्रमांक इंटर करा त्यांनतर Captcha इंटर करूनSend OTP या बटनावर क्लीक करा. व तुमच्या Register Mobile Number वर आलेला OTP इंटर करून log in बटनावर क्लिक करा.
५. यामध्ये UIDAI तुम्हाला अनेक services देते त्या पुढील प्रमाणे
- a. Download aadhar (आधार कार्ड डाऊनलोड)
- b. Order Aadhar PVC Card (आधार PVC कार्ड)
- c. Online Update Service (ऑनलाइन अपडेट सेवा)
- d. Lock/Unlock Biometrics
- e. Authentification History
- f. Offline eKYC
- g. Payment History
- f. Document Update
आता Online Update वर क्लिक करा
६. online Update वर क्लिक केल्यानंतर वरील interface Open होईल.
येथे ४ पर्याय (Option) दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला हव्या असलेल्या पर्यायावर click करा
- a. Update Name (नाव दुरुस्ती ) नावात दुरुस्ती हि फक्त २ वेळा करू शकता.
- b. Change in Date of Birth (जन्मतारखेत दुरुस्ती ) १ वेळा जन्म तारखेत दुरुस्ती करता येते.
- c. Gender (लिंग दुरुस्ती)
- d. Change in Adress (पत्त्यामध्ये दुरुस्ती) हि तुम्ही कितीही वेळा करू शकता
तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडून नवीन माहिती भरा व दिलेल्या Document (कागदपत्रे) upload करा.
७. हे सर्व झाल्यांनंतर शेवटी तुम्हाला payemt करायचे आहे त्यासाठी तुम्ही DEBIT/CREDIT (डेबिट/क्रेडीट) कार्ड च्या साहायाने करू शकता अथवा Mobile Banking व UPI ने हि Payment करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त ५० रुपये pay करायचे आहेत. त्यामुळे तुमचे अतिरिक्त पैसे (Extra Money) पण Save होतात आणि वेळही (time) हि वाचतो. payment केल्यानंतर आलेली aknowledgement reciept download करून ठेवा.
आधार कार्ड online पद्धतीने Update करण्याचे फायदे
- Online update मुळे तुम्ही केव्हाहि तुमचे आधार कार्ड update करू शकता याकरिता तुम्हाला वेळेचे (time) बंधन नाही. दिवसा रात्री केव्हाही आधार अपडेट (Aadhaar update) करू शकता.
- स्वतः आधार कार्ड अपडेट करण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही.
- आधार दुरुस्ती (Aadhaar update) साठी जास्त कागदपत्रांची (Documents) ची आवश्यकता लागत नाही.
- online update मुळे आधार कार्ड दुरुस्ती करणे सोपे व स्वस्त झाले आहे.
- M-Aadhaar या Mobile Application च्या सहाय्याने तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही update केलेल्या आधार कार्ड चा मागोवा घेऊ शकता.
How do I check Aadhar card status?
Aadhaar Card Status तपासण्यासाठी पुढील Steps Follow करा.
- My Aadhaar Dropdown मेनू मधून check Aadhaar Status वर क्लिक करा.
- मुख्य पानावर २ Option दिसतील १. check aadhaar pvc card status आणि दुसरा २. check Enrolment & update status. जर तुम्हाला order केलेल्या pvc card चे status check करायचे असेल तर पहिला पर्याय निवडा आणि जर तुम्ही नवीन आधार कार्ड काढले असेल किंवा update केले असेल तर दुसरा पर्याय निवडा.
- नवीन आधार कार्ड किंवा आधार कार्ड update केले असेल तर तुम्हाला मिळालेल्या पावतीवरील Enrolment ID किंवा SRN / URN नंबर Enter Enrolment ID, SRN or URN येथे इंटर करा.
- त्यानंतर captcha इंटर करून Submit बटनावर Click करा.
जर तुम्ही SRN Number इंटर केला म्हणजेच तुम्ही online aadhaar update status चेक करत असणार तर पुढीलप्रमाणे Result (परिणाम) दाखवेल.
update केल्यापासूनचे सर्व status येथे दाखवेल आणि जर तुमची update Request पूर्ण झाली असेल तर Completed च्या वर्तुळात बरोबर ची टिक दाखवेल.
नवीन नोंदणी केलेल्या आधार कार्ड चे status check करताना enrolment इंटर करावा. enrolment नंबर इंटर करताणा विशेष काळजी घ्या.
Enrolment Number इंटर करताना तारखेच Format पुढील प्रमाणे असावा : YYYYMMDD
पावतीवरील दिनांक हा DDMMYY अशा स्वरुपात असतो तो तसाच इंटर केला तर तुमचा enrolment Number चुकीचा असल्याचे Notification दाखवेल.
Submit बटनावर क्लिक केल्यानंतर जर तुमच्या नवीन आधार कार्ड ची नोंदणी यशस्वी झाली असेल तर तुम्हाला पुढील ओळी दिसतील. Your Aadhaar has been generated. While your Aadhaar is being printed and posted to you, please download eAadhaar from www.UIDAI.gov.in असे Notification आल्यांनतर तुम्ही Download aadhaar मध्ये जाऊन आधार कार्ड Download करू शकता.
How to download Aadhaar Card / eAadhaar ?
पावतीवरून आधार कार्ड / इ-आधार कसे download करायचे ते Step by Step बघू.
myaadhaar.uidai.gov.in या uidai च्या home Page वर आल्यांनतर Download aadhaar या पर्यायावर क्लीक करा. पुढील Dashboard Open झाल्यावर त्यातील Enrollment ID हा पर्याय निवडा व तुमचा Enrollment ID Enter करा, Captcha इंटर करून Send OTP वर क्लिक करा.
Send OTP वर क्लीक केल्यांनतर तुम्हाला तुमच्या Aadhaar Registered Mobile Number वर OTP (One time Password) गेल्याचे दिसेल.
तुमच्या Aadhaar Registered Mobile Number वर आलेला OTP इंटर करून Verify & Download वर क्लिक करा.
Verify & Download वर क्लिक केल्यावर तुमचे आधार कार्ड PDF स्वरुपात download होईल.
How to Open Password Protected Aadhaar Card Pdf ?
- Which password used in aadhaar card?
- How can i Recover my Aadhaar card password?
- Aadhar card Pdf Paasword
- how to open aadhar card pdf file password ?
Download केलेली Aadhaar card ची PDF Open करण्याकरिता तुमच्याकडे Password मागण्यात येईल. हा password तुमच्या नावातील इंग्रजीतील पहिली 4 अक्षरे (Letters) मोठी (Capital) अशा स्वरुपात व आधार कार्ड वर टाकलेले तुमचे जन्म वर्ष (Year of Birth) टाका.
उदा. Namdev हे तुमचे नाव आहे आणि तुमचे जन्म वर्ष २००२ आहे तर तुमचा password असेल : NAMD2002.
how to open aadhar card pdf file without password ?
aadhaar card PDF विना password ची कुठेही ओपेन करण्याकरिता सर्वप्रथम आधार कार्ड ची PDF open करून ती save as pdf म्हणून दुसऱ्या जागी save करा किंवा Print to Microsoft Pdf Printer ने print म्हणून नवीन नावाने save करा. त्यानंतर हि Pdf वापरा. हि pdf ओपन करण्याकरिता password ची गरज पडणार नाही.
तुम्हाला माझ्या ब्लॉग वरील माहिती आवडली असेल तर तुमचा अभिप्राय नाक्कि कळवा खाली Comment Box मध्ये तुम्ही लिहू शकता, धन्यवाद !
1 thought on “How Update aadhaar in Minutes”
Comments are closed.