How to Check PM Kisan status 2022

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM – Kisan) 

         प्रधान मंत्री किसान सन्मान निधी pm kissan हि योजना (Government Scheme) केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केली असून याचा मूळ उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी मदत करणे हा होता. या योजनेच लाभ भारतातील सर्व लहान मोठ्या शेतकऱ्यांना घेता येणार आहे. 

        या योजनेची सुरवात १ डिसेंबर २०१८ पासून लागू करण्यात आली असून याचे स्वरूप पुढीलप्रमाणे असणार आहे.


PM – KISAN  योजनेची उद्दिष्टे 

१. देशातील सर्व लहान मोठ्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून केंद्र शासनाच्या सहकार्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM KISAN)  भारताचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी  यांनी सुरु केली.

 

२. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या इतर गुंतवणुका तसेच घरातील लहान मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत मिळेल, तसेच शेतातील पिक पूर्ण तयार होण्याच्या कालावधीत जो आर्थिक तुटवडा भासतो तो भरून काढण्यास मदत मिळेल.

 

३. पिक तयार होण्याच्या काळात पैशांची अडचण भागविण्यासाठी शेतकरी सावकाराकडे पैसे उधार घेतात, PM KISAN योजनेमुळे सावकारीला आळा घालण्यास मदत मिळेल.

What are the Benefits of Pm Kisan Scheme?

प्रधान मंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकर्यांना प्रती वर्षी ६,००० रु. मिळणार असून ते शेतकरी बांधवांच्या आधार लिंक खात्यावर दर चार – चार महिन्याच्या अंतराने सरळ खात्यात (DBT) द्वारे जमा होणार आहेत.

How to apply for Pm Kisan Scheme?

प्रधान मंत्री शेतकरी सन्मान योजने करिता अर्ज कसा करावा ?

     या योजनेसाठी तुम्ही २ प्रकारे अर्ज करू शकता  १. स्वतः PM Kisan या अधिकृत संकेतस्थळावर जावून Online पद्धतीने नोंदणी करू शकता अथवा २. तुमच्या नजीकच्या CSC CENTER ला भेट देवून त्यांच्याकडून तुम्ही अर्ज करू शकता 

How to Register Online For PM KISAN Scheme

१. Online अर्ज (pm kisan registration) करण्याकरिता  सर्वात आधी PM KISAN च्या www.pmkisan.gov.in  अधिकृत संकेत स्थळावर जा.

 

२. त्यानंतर Home Page वरील  New Farmer Registration वर Click करा.

 

३. New Farmer Registration वर Click केल्यानंतर खालीलप्रमाणे New Farmer Registration Form ओपन होईल. 

 

pm kisan

४. या फॉर्म मध्ये सर्वप्रथम शेतकरी ग्रामीण किंवा शहरी भागातील आहे का त्याची निवड करावी, ग्रामीण भागातील असल्यास Rural व शहरी भागातील असल्यास Urban हा पर्याय निवडा

५. त्यानंतर आधार क्रमांक (enter your aadhaar number) टाकून तुमचा चालू मोबाईल नंबर टाका व त्यानंतर तुमचे राज्य निवडा, शेवटी खाली दिलेल्या चित्रातील अक्षरे (captch code) आहेत त्याप्रमाने दिलेल्या जागेत Type करून Get Otp या बटनावर क्लिक करा.

 

६. आलेला OTP प्रविष्ट केल्यांनतर तुमच्या आधार Register मोबाईल नंबर वर पुन्हा UIDAI आधार चा एक OTP येईल तो इंटर करून  Verify Aadhaar OTP या बटनावर क्लिक करा.

 

 

pm kisan registration


 

 ७. त्यानंतर मुख्य फॉर्म ओपन होईल त्यावरील सर्व माहिती तुमच्या कागदपत्रामाणे भरायची आहे.  शेतकऱ्याची माहिती आधार कार्ड प्रमाणे Automatically भरली जाते, बाकी राहिलेले रेशन कार्ड नंबर, आणि ७/१२ वरील माहिती पूर्ण भरावी.

 

pm kisan form


 

८.  जमिनीची माहिती भरण्यासाठी ७/१२ वरील माहिती अचूकपणे भरून add बटनावर क्लिक करा सर्व माहिती भरून झाल्यावर ती पुन्हा तपासून अचूक असल्याची खात्री करून घ्या.

 

 

pm kisan reg form

 

९. त्यानंतर फॉर्म भरायची शेवटची पायरी आवश्यक असणारी कागदपत्रे UPLOAD करा, Land मध्ये तुमच्या शेताचा ७/१२ अपलोड करा. आणि aadhaar च्या तेथे तुमच्या आधार कार्ड ची Xerox अपलोड करा. व Save बटनावर  क्लिक करा. 

 अशा प्रकारे  तुम्ही online पद्धतीने अर्ज करू शकता.

  People also ask  

  • pm kisan status

  • pm kisan beneficiary status

  • pm kisan status check 2021

 

How to Check PM Kisan Status ?

या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती (beneficiaries status) जाणून घेण्यासाठी Beneficiary Status या बटनावर  Click करा तुमच्या अर्जाचे  status  तुम्ही Registration Number किंवा Mobile Number टाकून बघू शकता. यात तुम्हाला तुम्हाल मिळालेले PM Kisan चे हफ्ते व बाकी असलेले हफ्ते यांची पूर्ण माहिती मिळेल.

 

pm kisan status

 PM KISAN GOI – Mobile app

    योजनेची सर्व माहिती तुम्हाला  एका app वर उपलब्ध करून देण्यासाठी Goolgle play Store वर PM KISAN GOI म्हणून सर्च करा प्ले स्टोर वर हे अप्लिकेशन मोफत उपलब्ध असून त्याची Size फक्त २.८ इतकी आहे. या अप्लिकेशन मध्ये तुम्ही पुढील गोष्टी करू शकता,

    PM kisan app     

1. Beneficiary Status

2. Edit Aadhar Details

3. Status of self Registered farmers 

4. New farmer Registration

5. Aadhar eKyc

 

pm kisan mobile app


 

PM Kisan eKyc 2022 ?

PM Kisan योजनेसाठी अर्ज सर्व शेतकऱ्यांना केंद्र  सरकारने  eKyc करणे  बंधनकारक केले असून ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत kyc करण्याची मुदत देण्यात आलेली होती, पण webiste वरील load  व  तांत्रिक अडचणी मुळे हि मुदत ७  दिवस वाढवून ती ७ सप्टेंबर २०२२ करण्यात आली आहे.

त्यामुळे शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर KYC करून घ्यावी अन्यथा ज्या शेतकरी बांधवांची  ekyc पूर्ण झालेली नसेल त्याच्या खात्यावर पुढील हफ्त्यांची रक्कम जमा होणार नाही म्हणून लवकरात लवकर ekyc पूर्ण करा यासाठी तुम्ही OTP Based ekyc करू शकता. त्यासाठी pmkisan.gov.in या संकेत स्थळावर जाऊन ekyc या बटनावर click करा.

 

pm kisan ekyc


 

 OTP Based pm kisan KYC साठी आधार क्रमांक टाकून search बटनावर क्लिक करा आलेली माहिती तुमचीच असल्याची खात्री करा व तुमचा आधार क्रमांकाशी संलग्न असणारा मोबाईल नंबर टाका, मोबाईल नंबर वर आलेला OTP टाकून submit बटनावर क्लिक करा. तुमची PM KISAN ekyc पूर्ण झाली आहे.

People also Ask

  • how to apply pm kisan samman nidhi ?
  • how can i check my pm kisan beneficiary status 2021
  • how to activate pm kisan account
  • pm kisan status 2021 check aadhar
  • pm kisan status check 2021 9th installment date
  • pm kisan samman nidhi yojana
  • What is Pm Kisan Scheme?

Comments are closed.