Dr.babasaheb ambedkar | mahamanav

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६)

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ साली झाला. त्यांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान हे पाश्चात्य तत्त्वज्ञ John Dewey यांच्या शैक्षणिक सिद्धांतांवर आधारित होते. Dewey यांच्या मते ढोबळ मानाने शिक्षण म्हणजे जीवनाची अखंडता आणि सातत्य. त्यांनी मागासलेल्या जमातीसाठी शैक्षणिक मंडळ स्थापन केले. आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार शिक्षण म्हणजे Dewey यांचा उपयुक्ततावाद आणि बुद्धांचा धम्म यांचा मिलाफ. शिक्षण म्हणजे समाजात वावरताना लागणारी गतिशीलातच नव्हे तर आधुनिकीकरणाचे प्रवेशद्वार आहे. दलितांसाठी शिक्षण हे एक साधन आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि शिक्षण/स्त्री शिक्षण यासाठीचे योगदान

* स्त्रियांना प्रेरित करणे

महात्मा फुले आणि त्यांची पत्नी यांचे कार्य डॉ. आंबेडकर यानी पुढे चालू ठेवले. सुरुवातीपासूनच जातीभेद नष्ट करण्याच्या संघर्षात त्यांनी महिलांना सामील करून घेतले. त्यांना कळून चुकले की, स्त्रीमुक्ती झाल्याशिवाय मूलनिवासींची खरी प्रगती होणे शक्य नाही. त्यांनी मग महिलांना प्रेरित करायला सुरुवात केली. २० व्या शतकाच्या सुरूवातीला ब्राह्मणांकडून विरोध झाला तरीही अस्पृश्यांना आणि महिलांना नागरीकत्वाबरोबर मताधिकार देण्याचा त्यांचा निर्धार पूर्ण झाला. हाच स्त्रीमुक्तीच्या युगाचा प्रारंभ होता.

* कुटुंब नियोजनाला पाठींबा

डॉ. आंबेडकर हे कुटुंब नियोजनाचे खंदे पुरस्कर्ते होते. १९३८ मध्येच त्यांनी कुटुंब नियोजनाची गरज ओळखली
होती. त्या काळात तर कोणीही अशा विचारांची कल्पनाही केली नव्हती. यांनी तर स्वतःच्या पालकांवरही टीका केली कारण ते त्यांचे १४ वे अपत्य होते. यावरूनच त्यांची महिलांच्या कल्याणाविषयीची कळकळ दिसून येते.

* स्त्रियांना समान दर्जा

राज्यघटना आखणी समितीचे अध्यक्ष या नात्याने घटनेच्या माध्यमातून सर्व धर्माच्या स्त्री पुरुष नागरिकांना समान
दर्जा मिळावा यासाठी ते आग्रही होते. अशाप्रकारे ज्या स्त्रियांना हिंदू धर्मग्रंथानुसार हीन दर्जा दिला गेला त्या
स्त्रियांना प्रथमच कायदेशीररित्या समान दर्जा बहाल केला गेला.