राजा राममोहन रॉय | Raja Ram Mohan Roy In Marathi
एकोणिसाव्या शतकातील पहिले भारतीय धर्मसुधारक व आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाणारे राजा राममोहन रॉय (Raja Ram Mohan Roy Contribution) यांच्या प्रयत्नांमुळे तत्कालीन सामाजिक, राजकीय आणि धार्मिक विचारसरणीवर त्यांचा खूप मोठा प्रभाव पडला.
Picture of raja ram mohan roy
जन्म व बालपण | Raja Ram Mohan Roy Biography
२२ मे १७७२ रोजी बंगालमधील राधानगर या लहानशा खेडेगावात एका ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव ईश्वरचंद ठाकूरदास बंडोपाध्याय ते भाषेचे उत्तम जाणकार होते.
त्यांनी संस्कृत, इंग्लिश, हिंदी, पर्शिअन, हिब्रू, ग्रीक आणि latin या भाषांवर प्रभुत्व मिळवले होते. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग या विविध भाषांमधील धार्मिक ग्रंथ वाचण्यासाठी केला आणि धर्म या विषयात सखोल ज्ञान मिळवले.
जर हिंदू धर्माला आपले स्थान आणि ताकद टिकवून ठेवायची असेल तर त्यात काही बदल घडवून आणणे गरजेचे आहे आणि त्याच कारणासाठी ब्राह्मो समाज अस्तित्वात आला. या समाजातील तत्त्वांनी धर्मातील कडवेपणा झुगारून दिला, विश्वबंधुत्व आणि समानता आणि एकच देव या संकल्पनांवर भर दिला.
राजा राममोहन रॉय – एक धर्म सुधारक
सामाजिक क्षेत्रात राजा राममोहन रॉय यांनी असमानता, बालविवाह, सती प्रथा, जातीय भेदभाव आणि हिंदू धर्मातील अनेक वाईट चालीरितींना विरोध केला.
धार्मिक कार्यात चालत असलेला पुजाऱ्यांचा दांभिकपणा, मूर्तीपूजा, क्लिष्ट धार्मिक विधी, यज्ञाच्या नावाखाली माणसाचे अथवा प्राण्याचे दिले जाणारे बळी यांना त्यांनी उघड विरोध केला.
त्यांनी स्त्री शिक्षण आणि विधवा विवाह या दोन गोष्टींकडे समाजाचे लक्ष वेधून घेतले.
त्यांनी पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीला विरोध केला नाही कारण त्यांना माहित होते की, भारतीय शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी या पाश्चात्य पद्धतीच्या वैज्ञानिक शिक्षणातून दूर होऊ शकतात.
ते स्वतः भारतीय संस्कृती आणि भारतीय साहित्य यांच्या उन्नतीसाठी आणि उद्धारासाठी झटत होते. त्यांना वाटत होते की, लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी फक्त कायदेशीर मार्गाचा अवलंब केला पाहिजे.
धर्माचे पुनरावलोकन आणि पुनर्मुल्यांकन हे राजा राम मोहन रॉय यांचे प्रमुख उद्दिष्ट होते.
त्यांच्या मते धर्माला तर्कशुद्धता आणि आधुनिकता यांची जोड दिली पाहिजे. अतार्किक धर्म हे समाजातील सगळ्या बाईट चालीरितींचे मूळ आहे.
या देशाची सामाजिक आणि राजकीय प्रगती ही मुख्यत्त्वे धार्मिक आचार-विचारातील क्रांती यावर अवलंबून आहे. हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणण्याबरोबरच जगातील इतर अनेक धर्मातील दरी मिटवण्याकडे त्यांचा कल होता.
त्यांनी विविध धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या असे लक्षात आले की, खरा हिंदुत्ववाद, खरा इस्लामवाद आणि खरा ख्रिश्चनवाद हे मूलभूतरित्या एकमेकांपासून वेगळे नाहीत.
सगळ्या धर्मातील उत्तमोत्तम तत्त्वे एकत्र करून मानव जातीसाठी एक वैश्विक धर्म स्थापन करावा असे त्यांच्या मनात होते.
सगळ्या मानवजातीसाठी एकच वैश्विक धर्म ही संकल्पना फक्त धार्मिक साहिष्णुतेपुरती मर्यादित नव्हती तर वेगवेगळ्या धर्मातील सांप्रदायिक भिंती तोडण्यासाठी तिचा वापर करावा असे त्यांना वाटत होते.
अशाप्रकारे सगळ्या धर्मांना एकत्र आणून आध्यात्मिक एकीकरण करण्यावर त्यांनी भर दिला. ते स्वतः एकेश्वरवादी झाले.
१८२८ मध्ये त्यांनी ब्राह्मो समाज स्थापन केला. हा ब्राह्मो समाज धार्मिक आणि तात्त्विक चिंतन मनन आणि विचारविनिमयाचे व्यासपीठ बनले. रॉय यांच्या धर्मावरील टीकेने सर्व धर्मांचे धर्मोपदेशक त्यांच्या विरोधात गेले. पण काळाने निश्चितपणे रॉय यांच्या विचार आणि कृतीची यथार्थता पटवून दिली..
राजा राम मोहन रॉय यांचे योगदान | Raja Ram Mohan roy contribution
त्याकाळातली परिस्थिती पाहता भारत देशातल्या समस्यांनी फारच उग्र रूप धारण केले होते. या समस्या सोडवण्यासाठी एखाद्या अलौकिक बुद्धीमत्ता असलेल्या व्यक्तीची गरज होती.
राजा राममोहन रॉय यांच्याकडे फक्त राजकीय समस्यांवरच नाही तर त्या काळातील सामाजिक आणि आर्थिक समस्यांवरही उपाय होते. या सगळ्या समस्या सोडवण्याचं श्रेय फक्त त्यांनाच जाते.
भारतातील उदारमतवाद आणि नवीन विचारसरणीचे उग्दाता म्हणून राजा राम मोहन रॉय यांना मानले जाते.
सतीप्रथा बंदी
(image source – meraranng)
राजा राम मोहन रॉय यांनी अतिशय धाडसीपणे सतीप्रथा आणि जातीयवाद याविरुद्ध आवाज उठवला. हिंदू समाजाला लागलेला कलंक सतीप्रथा कायदेशीररित्या नष्ट करण्यासाठी सरकारपुढे प्रस्ताव ठेवण्याचं श्रेय त्यांनाच जाते.
धार्मिक सुधारणा
राजा राम मोहन रॉय यांनी उदारमतवादाचा रस्ता सुकर केला. मानवता आणि स्वातंत्र्य यासाठी त्यांना कळकळ होती. असहिष्णुतेच्या काळात ते धार्मिक सहिष्णुतेच्या बाजूने उभे राहिले.
त्यांनी त्या काळातील ब्राह्मण आणि इतरांनी पाठिंबा दिलेल्या मुर्तीपूजेला यशस्वीपणे आव्हान दिले. त्यांनी ब्राह्मो समाज नावाची संस्था उभारली जिथे सगळ्यांच्या वर असलेल्या एका सर्वोच्च देवाची प्रार्थना होत असे.
देशाबद्दलच्या असीम भक्तीने ते प्रेरित झाले होते. त्यांना कळून चुकले होते की, त्यावेळच्या परिस्थितीत भारतीय हे एकमेकांपासून दुरावलेले आणि विभागलेले होते अशा परिस्थितीत ते ब्रिटिशांना आव्हान देऊ शकत नाहीत.
त्यांना परिस्थितीची पूर्ण कल्पना होती आणि म्हणूनच जुलमी अशा ब्रिटिशांकडूनच ही सुधारणेची कामे करून घेणे त्यांना गरजेचे वाटले.
त्यांना ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर पूर्ण विश्वास होता. ते एवढे देशभक्त होते की, त्यांनी देशबांधवांना ब्रिटिशांच्या ज्ञानाचा फायदा होईल म्हणून त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांना आपल्या देशात राहण्याची आणि देशबांधवाना ज्ञान देण्याची परवानगी दिली.
वृत्तपत्र स्वातंत्र्य
दीर्घकाळापासून भारतातली लोकं ज्याची वाट बघत होती त्या कायद्याच्या राज्यासाठी रॉय आर्जवे करत होते. ही मागणी खूप धाडसाची होती पण तरीही खूप ताकदीने मांडली होती. त्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधने आणणाऱ्या प्रत्येक गोष्टीविरुद्ध आवाज उठवला आणि सांगितले की, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधने आणली तर त्याचा परिणाम क्रांतीत होईल.
एकीकरण
राजा राममोहन रॉय हे पाश्चिमात्य संस्कृतीचे चाहते होते. त्यांनी पाश्चिमात्य साहित्याचाही सखोल अभ्यास केला होता. ब्रिटिश उदारमतवाद्यांचे ते आवडते होते. ब्रिटिश राजाही त्यांच्याशी गप्पा मारत असे.
तरीही त्यांनी भारतीय संस्कृतीचा झेंडा कायमच उंच उभारून धरला होता. त्यांनी त्यांच्या कल्पना पाश्चिमात्य राजकीय तत्त्वज्ञाकडून आंधळेपणाने घेतल्या नव्हत्या आणि भारतीय संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृती लादण्याचाही कधी प्रयत्न केला नाही. त्यांनी भारतीय धर्मग्रंथातून प्रेरणा घेतली आणि त्यानुसार आपली तत्त्वे ठरवली.
मृत्यू | Death of Raja Ram Mohan Roy
२७ सप्टेंबर १८३३ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी मेंदुज्वरामुळे त्यांचे निधन झाले.
1 thought on “Raja Ram Mohan Roy Information in Marathi”
Comments are closed.