Imp Question Paper Course 201
S.Y.B.Ed. (General) शिक्षणशास्त्र द्वितीय वर्ष प्रश्नपत्रिका (Question Paper) Question Paper Course 201 पुणे विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२१ – २२ बी.एड द्वितीय वर्षाच्या सर्व प्रश्नपात्रिका मी इथे अपलोड करत आहे PDF Format मध्ये व Text अशा दोन्हीही स्वरुपात उपलब्ध आहेत .
S.Y.B.Ed. (General) – 2022 – Question Paper Course 201
QUALITY & MANAGEMENT OF SCHOOL EDUCATION
(शालेय शिक्षणाची गुणवत्ता आणि व्यवस्थापन NUS Pattern) (Credit System)
(मराठी रूपांतर)
वेळ : 3 तास/ एकूण गुण: 80
सूचना :- 1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
2) उजवीकडील प्रश्नांचे अंक गुण दर्शवितात.
4) 15 गुणांच्या उत्तरासाठी शब्दमर्यादा 400 ते 425 आहेत. 5 गुणांच्या उत्तरासाठी शब्दमर्यादा 150 ते 175 शब्द आहेत.
…………………………………………………………………………………………………………………………………………………….
प्रश्न 1)
संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन’ संकल्पना स्पष्ट करा. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनासाठी हेरी फेयॉल यांच्या 14 तत्वे वापर कसा कराल हे सोदाहरण स्पष्ट करा. [15]
किंवा
शैक्षणिक व्यवस्थापन संकल्पना स्पष्ट करा शैक्षणिक व्यवस्थापनाची कार्ये स्पष्ट करा, पीटर ड्रकरे यांची व्यवस्थापनाची तत्वे स्पष्ट करा.
प्रश्न 2)
‘नेतृत्व’ संकल्पना स्पष्ट करा. एकाधिकारशाही नेतत्त्व व लोकशाही नेतत्त्व खालील मुददयांच्या
आधारे स्पष्ट करा. [15]
अ) संकल्पना
ब) फायदे
क) तोटे
किंवा
सेवापूर्व प्रशिक्षण म्हणजे काय ? सेवापूर्व प्रशिक्षणाची गरज व उद्दिष्टे स्पष्ट करा. सेवा पूर्व प्रशिक्षणातून शिक्षकाची कोणती कौशल्ये विकसित होतात.
प्रश्न 3)
स्थगन व गळतीची समस्या सविस्तर स्पष्ट करा. स्थगन व कारणे कोणती स्थगन व गळती थांबविण्यासाठी शाळेत कोणत्या उपाययोजना कराल? [15]
किंवा
‘शालेय शिस्त’ म्हणजे काय ? शालेय शिस्त राखण्यासाठी विदयार्थी व शिक्षक यांच्यासाठी
नियमावली तयार करा.
प्रश्न 4)
‘शालेय दफ्तर’ म्हणजे काय? शालेय दफ्तराचे विविध प्रकार स्पष्ट करा. शालेय दफ्तर सांभाळून
ठेवण्याचे महत्त्व स्पष्ट करा. [15]
किंवा
-राज्य शैक्षणिक प्रशासनाचा आराखडा स्पष्ट करा. C.B.S.E. व I.C.S.E. बोर्डाची रचना व कार्य
स्पष्ट करा.
प्रश्न 5 ) खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. (कोणत्याही 4)
अ) शैक्षणिक व्यवस्थापनाची वैशिष्टये स्पष्ट करा.
आ) शालेय अधिस्विकृतीची गरज स्पष्ट करा.
इ) मुख्याध्यापकांची भूमिका स्पष्ट करा.
ई) बालकाच्या विकासात पालकाची काय भूमिका आहे?
उ) सविस्तर स्पष्ट करा अभ्यासपूरक कार्यक्रमांचे महत्व.
ए) एन. सी. टी. ई. (नॅशनल कॉन्सिल फॉर टीचर एज्युकेशन) कार्य स्पष्ट करा.
***
प्रश्नपत्रिका Question Paper Course 201 PDF स्वरुपात मराठीमध्ये Download करण्यासाठी Download बटनावर क्लिक करा.