Focus ई – लर्निग (e – learning)

ई – लर्निग (e – learning) चा इतिहास

कोरोना सारख्या महामारीने सर्व जीवन विस्कळीत करून टाकले, देशाचा विकास किती तरी वर्ष मागे गेला, आर्थिक व्यवस्था विस्कळीत झाली सर्व काही मागच्या दिशेने जात असताना शिक्षणाचे कसे होणार? हा प्रश्न सर्वांनाच भेडसावत होता पण शिक्षण क्षेत्रात क्रांती घडून आली ती ई – लर्निग (e – learning) च्या रूपाने.

खर तर 1995 मध्ये सर्वप्रथम ई – लर्निग (e- learning) ची सुरवात झाली असली तरी सुरवातीस तिचा एवढा विकास झालेला नव्हता त्यावेळी ई – लर्निग (e – learning) ला Internet Based learnig म्हणून ओळखले जात होते काही काळानंतर हीच Internet Based learning, Online Learning म्हणून नावारूपाला आली सुरवातीच्या काळात पाश्चिमात्य देशात online learning चा वापर मोठ्या प्रमाणावर झालेला दिसला आता कोरोनाकाळात हीच online learning बनली ई – लर्निग (e- learning).

  • How e learning education reach to teach children in cities and villages?
  •  शहरातील शाळाआणि खेड्यातील शाळांपर्यत  ई  लर्निंग कसे पोहोचते ?

ई – लर्निग (e – learning)

 ई – लर्निग (e- learning) म्हणजे काय ?

ई – लर्निग (e – learning) म्हणजे काय थोडक्यात सांगायचे झाले तर e म्हणजे (electronic) इलेक्ट्रॉनिक म्हणजेच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अध्ययन, “परंपरागत शिक्षण पद्धतीत बदल केले नाहीत तर एक दिवस आपण आपल्या मुलांकडून त्यांचा भविष्यकाळ हिरावून घेऊ” हे थोर अमेरिकन विचारवंत जॉन डूई यांनी त्यावेळी मांडलेले विचार आज सार्थ ठरतात.

कोरोनाच्या महामारी मुळे का होईना पण भारतीय परंपरागत घोकंपट्टीतून शिक्षणाची सुटका होण्यास मदत झाली आणि आपणही आधुनिकतेकडे वळलो. शिक्षणाच्या दर्ज्यात सुधारणा होऊन विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे घेऊन जाणारी नवीन शिक्षण पद्धती उदयास आली.


             ई – लर्निग (e – learning) पद्धतीमध्ये अनेक साहित्याचा समावेश होतो त्यात दूरदर्शन,रेडिओ, मोबाईल, संगणक, प्रोजेक्टर, एलसीडी इत्यादी, शैक्षणिक साहित्य म्हणून अनिमेटेड व्हिडिओ, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, इंटरनेटवरील विविध व्हिडिओ, लेख, ब्लॉग इत्यादी वरून मिळणाऱ्या विविध माहितीचा वापर e- learning पद्धतीमध्ये मुक्तपणे केला गेला.

शहरी आणि ग्रामीण भागातील ई– लार्निंग (e – learning).

e-learning चा विकास होत असला तरीही ग्रामीण भाग आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणावर
तफावत आढळते. e-learning ही संकल्पना सुंदर वाटत असली तरीही ती खर्चिक आहे त्यासाठी लागणारे साहित्य ग्रामीण भागात सहजरीत्या उपलब्ध होत नाही त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात.

शहरातील ई– लर्निग (e- learning)

शहरात ई – लर्निगचा विकास झपाट्याने झाला, त्याची कारणेही तसेच आहेत, शहरात इंटरनेट, टीव्ही, प्रोजेक्टर, संगणक ही साधने आधीपासूनच उपलब्ध होती त्यामुळे शहरात e-learning चा विकास वेगाने झाला.

शिवाय शहरांमध्ये कुशल अध्यापक वर्ग असल्याने त्यांना हे तंत्रज्ञान हाताळणे आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोचविणे सोपे झाले.

Download Images pnglab.in
Download free PNG Images

ग्रामीण भागातील ई – लर्निग (e- learning)

ग्रामीण भागात ई – लर्निग (e- learning) चा विकास होण्यास शहरांच्या तुलनेने जास्त वेळ लागला, कारण त्यासाठी येणाऱ्या अडचणी खूप जास्त होत्या.

ग्रामीण भागात येणाऱ्या अडचणी.

१) ग्रामीण भागात सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे हे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोचणार कारण ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांना सर्वात आधी या तंत्रज्ञानाची ओळख करून देणे.

२) शिक्षक प्रशिक्षित त केल्यानंतर अडचणी संपल्या असे नाही इंटरनेट कनेक्शन व विजेचा पुरवठा काही शाळांमध्ये अजूनही विद्युत कनेक्शन नाही तेथे e-learning कशी अमलात आणणार.

३) अनुभवी शिक्षकांच्या कमतरतेमुळे शाळेसाठी आलेले सर्व संगणक व तांत्रिक साहित्य कधी विद्यार्थ्यांपर्यंत पोचत नाही ते तसेच पडुन असतात.

३) ग्रामीण भागात मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक पालकाला स्मार्ट फोन विकत घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही त्यामुळे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर शिक्षणास मुकावे लागेल.

ई– लर्निग विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी उपाय :

१) शिक्षकांनी प्राथमिक स्वरूपाचे प्रशिक्षण घेऊन (e- learning) चे कौशल्य स्वतः आत्मसात करावे व त्याचे उपयोजन वर्गात करावे.

२) youtube व इतर शैक्षणिक प्लॅटफॉर्म वर शैक्षणिक व्हिडिओ व माहिती उपलब्ध असली तरीही ती विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत उपलब्ध नाही त्यामुळे ती विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत रुपांतर करून सांगावी.

३) डाऊनलोड केलेले व्हिडिओ, प्रयोग, वर्गात विद्यार्थ्यांना मोठ्या प्रोजेक्टर व टीव्ही स्क्रीन वर दाखवून त्याचे स्पष्टीकरण देणे.

४) ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला  Mobile घेणे शक्य नसते त्यासाठी Group Study (सांघिक अध्ययन)  पद्धतीचा वापर करावा.