Difference between 15th august and 26th january

 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मध्ये काय फरक आहे ? 15th august and 26th january

15th august and 26th january

1) 15th august and 26th january |  15 ऑगस्ट ला पंतप्रधान ध्वजारोहण करतात    तर …   26 जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवतात कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.                                                                                         


2)  15 ऑगस्टला झेंडा      उघडलेल्या अवस्थेत दोरीने  वर चढवला जातो. त्याला ध्वजारोहण (flag hoisting)  म्हणतात तर…    26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला  जातो. त्याला (flag unfurling)  म्हणतात. 

3) 15 ऑगस्ट 1947 ला     इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात.   तर…   26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्या नंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले.

याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केला जातो, म्हणून त्याला झेंडा फडकवणे म्हणतात.                      


4)  15 ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर, 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो.    

 People also ask :

 who wrote vande mataram?