CTET – २०२२ परीक्षेसाठी अर्ज करा
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून (Central Board of Secondary Education) यावर्षीच्या डिसेंबर २०२२ मध्ये होणारी (Central teacher Eligibility Test ) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) ही CBT म्हणजेच (Computer Based Test ) ऑनलाईन पद्धतीने होणार असून लवकरच परीक्षेची विस्तृत सूचना अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल ज्यामध्ये परीक्षा, अभ्यासक्रम, पात्रता, परीक्षा फी, परीक्षा केंद्राच्या शहरांची नावे, तसेच परीक्षे संदर्भात महत्त्वाच्या तारखा CTET च्या अधिकृत संकेतस्थळ https://ctet.nic.in वर जाहीर करण्यात येणार आहे.
CTET च्या अधिकृत संकेतस्थळावरील दिनांक. १४/०७/२०२२ चा नोटीस मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, ज्या उमेदवारांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी CTET च्या अधिकृत संकेस्थळावर जाहीर होणाऱ्या सर्व नोटिसा नीट वाचाव्यात व अधिकृत संकेस्थळावरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
तूर्तास डिसेंबर २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षेचे परीक्षा शुल्क पुढील प्रमाणे असेल असे CTET च्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आले आहे.
CTET Exam Fee
वर्ग | पेपर १ किंवा २ | पेपर १ व २ (दोन्ही) |
---|---|---|
General /OBC | १०० रुपये | १२०० रुपये |
SC/ST/अपंग | ५०० रुपये | 600 रुपये |
Website | https://ctet.nic.in | |
अर्ज करा | Apply Here |
(Computer based Test ) CTET देण्याची ही पहिलीच वेळ आहे तर हे नक्कीच वाचा !
कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ही लेखी स्वरूपातील परिक्षेप्रमानेच असते त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. याकरिता तुम्हाला कॉम्प्युटर चे बेसिक ज्ञान असणे पुरेसे आहे कारण या टेस्ट मध्ये तुम्हा फक्त कॉम्प्युटर च्या माऊस चा वापर करायचा असतो. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट कश्या स्वरूपाची असते हे तुम्हाला कळावे यासाठी CTET च्या संकेतस्थळावरील Mock Test वरती Click करून परीक्षा कशा स्वरूपाची राहील हे तपासून पाहू शकता त्यासाठी पुढे दीलेल्या लिंक वर Click करा.
Mock Test सोडवल्यामुळे तुम्हाला परीक्षेची पूर्वकल्पना येईल त्यामुळे परीक्षा केंद्रावर तुमचा गोंधळ होणार नाही.
CTET परीक्षेला बसताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल !
१) परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेत पोहचा, परीक्षा केंद्रात जाताना आपला मोबाईल फोन व स्मार्ट वॉच काढून ठेवा.
२) कॉम्प्युटर स्क्रीन वरती उजव्या बाजूला तुमचा फोटो व तुमचे नाव बरोबर आहे ना याची खात्री करून घ्या. फोटो आणि तुमच्या नावात काही बदल आढळल्यास परीक्षा चालकांना तशी पूर्व कल्पना द्या.
३) लॉग इन डिटेल मध्ये तुमचा युजर नेम व पासवर्ड तपासून घ्या.
४ ) तुमच्या समोर असणारा माऊस नीट तपासून घ्या त्याला टेबल वर इकडे तिकडे फिरवून तो चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करून घ्या. काही अडचणी असल्यास केंद्र प्रमुखास सांगा.
५) पेपर सोडविताना प्रश्न नीट वाचा सोपे प्रश्न आधी सोडावा तुम्हाला येत नसलेलं प्रश्न शेवटी सोडवा तशी तरतूद तिथे केलेली आहे.
६ ) परीक्षा केंद्रातील केंद्र चालकांच्या सूचनांचे पालन करा. खूप घाई करू नका. कुठलीही तांत्रिक अडचण आल्यास घाबरून न जाता तुमच्या केंद्र चालकांना सांगा ते मदत करतील.