बौद्धिक अक्षमता (Mental Retardation)
बौद्धिकअक्षमता म्हणजे काय ? (Mental Retardation)
बौद्धिक अक्षमता (mental retardation) है एक विशिष्ट प्रकारचे विकलांगत्व आहे. मर्यादित स्वरुपाच्या मानसिक क्षमता हे याचे कारण असते. मर्यादित मानसिक क्षमतांमुळे महत्त्वपूर्ण मानसिक क्षमतांचा विकास होणे कठीण असते.
या उच्चतर मानसिक क्षमतांमध्ये कारणे दर्शवणे, नियोजन, विचार प्रक्रिया आणि अचूक अंदाज यांचा समावेश होतो. या मर्यादित मानसिक क्षमतांमुळे नवीन गोष्टीचे अध्ययन करणे हे कठीण बनते.
जर माणसाला नवीन काही गोष्टी शिकायच्या असतील तर त्याकरिता मानसिक क्षमता महत्त्वपूर्ण ठरतात.
बौद्धिकअक्षमतेचा अर्थ ( Meaning of Mental Retardation)
बौद्धिकदृष्ट्या अक्षमता असणान्या मुलांमध्ये इतर सर्वसाधारण मुलांशी तुलना करता कमी गतिने अध्ययन करतात व त्यांना अध्ययनविषयक कौशल्यांचा विस्तार करता येत नाही आणि त्याचप्रमाणे त्यांना समूहाबरोबर जगत असताना आवश्यक असणारी जी कौशल्ये (skills) ज्ञात असावी लागतात,
त्या कौशल्याचा त्यांच्यामध्ये अभाव असतो. या कौशल्यामध्ये संप्रेषण, स्वत ची काळजी घेणे, सामाजिक आणि व्यक्तिगत सुरक्षा कौशल्ये यांचा समावेश होतो.
ही बालके बौद्धिकदृष्ट्या अकार्यक्षम असतात व त्यांना विचार करण्यावर, कार्यकारण संबंध दर्शवण्यावर, स्मरणात ठेवण्यावर मर्यादा पडत असतात. लक्ष केंद्रित करणे आणि माहितीचे संघटन करणे यामध्ये त्यांना काठीण्य जाणवते.
बौद्धिक अकार्यक्षमतेचे प्रकार (Types Of Mental Retardation)
- अध्ययन अक्षमता (Learning Disabilities)
- मानसिकदृष्ट्या विकलांगत्व
- आत्मकेंद्रितता (Self Concern)
अध्ययन अक्षमता (Learning Disabilities)
अध्ययनादरम्यान बालकाला काही विशिष्ट स्वरुपाच्या ज्या अक्षमता निर्माण होतात, त्यांना एकत्रितरीत्या अध्ययन अक्षमता असे म्हटले जाते.
अध्ययन अक्षमता बालकामध्ये अध्ययन प्रक्रियेच्या संबंधाने असणारी भीती आणि काही आवश्यक कौशल्यांचा वापर न केला जाणे यांमुळे निर्माण होते.
वाचन, लेखन, श्रवण, भाषण, कार्यकारण संबंध दर्शवणे आणि गणिताची उदाहरणे सोडवणे यांसारखी अध्ययन कौशल्ये यामुळे प्रभावित होतात.
प्रत्येक बालकानुसार अध्ययन अक्षमताही भिन्न-भिन्न स्वरुपाची असते. एखाद्या विद्यार्थ्यामध्ये जर एखाद्या विशिष्ट प्रकारची अध्ययनविषयक अकार्यक्षमता असेल तर दुसऱ्या बालकामध्ये वेगळ्या प्रकारची अध्ययन अक्षमता निर्माण झालेली असते.
बौद्धिकअक्षमता (mental retardation) | Learning Disabilities, Self Concern
मानसिकदृष्ट्या विकलांगत्व
मानसिकदृष्ट्या विकलांगत्व हे बालकामध्ये साधारणपणे वयाच्या १८ वर्षांच्या पूर्वीच पहिल्यांदा दिसून येते. या मानसिकदृष्ट्या विकलांगत्वाचे पुढील चार प्रकार पडतात.
- सौम्य मानसिक विकलांगत्व
- मध्यम स्वरुपाचे विकलांगत्व
- तीव्र स्वरुपाचे विकलांगत्व
- जन्मजात विकलांगत्व
आत्मकेंद्रितता (Self Concern)
आत्मकेंद्रितता (self concern) ही संपूर्ण आयुष्यभर वैकासिक प्रक्रियेला अडथळा निर्माण करणारी अक्षमता असून याचा परिणाम व्यक्तीच्या संप्रेषण कौशल्यावरती तसेच ती इतर व्यक्तीशी कशी वागते याच्यावर होतो.
आत्मकेंद्रित व्यक्तीची जगाबाबतची जी संवेदना आहे तिच्यावरती देखील याचा परिणाम होतो.
Also Read : अटल पेन्शन योजना (APY)
बालक आत्मकेंद्रित असल्यामुळे त्याला निर्माण होणान्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या सांगण्यात अडचणी निर्माण होऊन काही विशिष्ट परीस्थितीत प्रतिसाद न दिल्याने ते बालक (child) अधिक कठीण परिस्थितीत जाते.
काही आत्मकेंद्रित बालके स्वतंत्रपणे जगू शकतात पण काही बालकांना या आत्मकेंद्रितपणाने अध्ययन अक्षमता जाणवते आणि त्यांना आयुष्यभर विशेष व्यक्तीच्या आधाराची गरज भासते.