विभाज्यतेच्या कसोट्या मराठी (Divisibility Rules in Marathi) म्हणजे काय ?
विभाज्यता म्हणजे एखाद्या संखेला पूर्ण भाग देण्यापेक्षा ती संख्या २ ते ११ या संखेमालेमधील कोणत्या संखेने भाग जातो हे बघणे म्हणजे विभाज्यता होय.
२ ची कसोटी (Divisibility Rule of 2)
जेव्हा एखाद्या संखेच्या एकक स्थानी (शेवटी )०, २, ४, ६, आणि ८ असेल तेव्हा त्या संखेला २ ने संपूर्ण भाग जातो. (सर्वच सम संख्यांना २ ने पूर्णपणे भाग जातो )
उदा. १२, २६, ७८, ३५८, १००४ इ.
३ ची कसोटी (Divisibility Rule of 3)
ज्या संखेच्या अंकांच्या बेरजेला ३ ने भाग जातो त्या संखेला ३ नेही निःशेष भाग जातो.
उदा. ३६, ८५५, २६२५ इ.
८५५ = ८+५+५+
= १८
८५५ या संख्येची बेरीज १८ येते १८ ला ३ ने भाग जातो म्हणून ८५५ लाही ३ ने निःशेष भाग जातो.
४ ची कसोटी (Divisibility Rule of 4)
जेव्हा एखाद्या संखेच्या शेवटच्या २ अंकांना ४ ने भाग जातो तेव्हा त्या संखेलाही ४ ने निःशेष भाग जातो.
उदा. ४२२८,९८३२,१२१२
वरील संख्यांच्या शेवटच्या अंकांना ४ ने भाग जातो म्हणून वरील तिन्ही संख्यांना ४ ने भाग जातो.
५ ची कसोटी
ज्या संख्यांच्या शेवटी ० किंवा ५ असेल तेव्हा त्या संख्येला ५ ने निःशेष भाग जातो
उदा. ४२२५,९८३० इ.
६ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ३ ने भाग जातो अशा संख्येला ६ ने निःशेष भाग जातो.
७ ची कसोटी
जेव्हा दिलेल्या संख्येतील एकक स्थानाच्या अंकाची दुप्पट केली असता ही दुप्पट उर्वरित अंकातून वजा केल्यावर तयार झालेल्या संख्येस 7 ने पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला पण 7 ने पूर्ण भाग जातो.
उदा. २७७२०
२७७२० या संख्येच्या एककस्थानी 0 असल्याने तो सोडून देऊ. उरलेल्या संख्येचा म्हणजे 2772 चा विचार करु
आता २७७२ च्या एककस्थानचा अंक २ आणि त्याची दुप्पट ४ हि दुप्पट २७७ मधून वजा करु
२७७ – ४ = २७३
२७३ साठी पुन्हा हीच कसोटी वापरु
२७३ च्या एककस्थानि ३ आहे त्याची दुप्पट ६ ती २७ मधून वजा करु २७ – ६ = २१
२१ ला ७ ने निःशेष भाग जातो, म्हणून २७७२० ला पण ७ ने पूर्ण भाग जातो.
९ ची कसोटी
जेव्हा एखाद्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला ९ ने भाग जातो, तेव्हा त्या संख्येला नऊ ने निःशेष भाग देता येतो.
उदा. ५७२६०३२२,
आता दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करू
५+७+२+६+०+३+२+२ =२७
अंकांची बेरीज २७ आणि तिला ९ ने भाग जातो म्हणून त्या संख्येला ९ ने भाग जातो.
१० ची कसोटी
जेव्हा एखाद्या संखेच्या एकक स्थानी शून्य असतो तेव्हा त्या संख्येला १० ने निःशेष भाग जातो .
उदा. – १००, ५१०, ६५०, १५४२० इ.
1 thought on “विभाज्यतेच्या कसोट्या मराठी (Divisibility Rules in Marathi)”
Comments are closed.