Famous Hindi Writers Of india

 हिंदी साहित्यातील श्रेष्ठ लेखक 

हिंदी साहित्यामध्ये अनेक  प्रसिध्द लेखकांनी  योगदान दिले आहे. प्रत्येक लेखकांची लेखनशैली वेग वेगळी असली तरी त्यांचे लेखन मात्र श्रेष्ठ असे आहे. इथे काही लेखकांची नावे व त्यांचे प्रसिद्ध साहित्य याची माहिती सादर करत आहे.

1. मुन्शी प्रेमचंद

मुन्शी प्रेमचंद यांचे लेखन हे इतिहासातील सर्वश्रेष्ठ  लेखकांपैकी एक आहेत. मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म ३१ जुलै १८८० रोजी उत्तर प्रदेश मध्ये झाला त्यांनी बहुतांश लेखन हे  हिंदी आणि उर्दू  भाषेमध्ये  केले.

साहित्य : गोदान, निर्मला, गबन, कफन, रंगभूमि, सेवासदन, मानसरोवर 

2. धरमवीर भारती 

धरमवीर भारती हे भारतातील लेखक, नाटककार आणि कवी होते. त्यांचा जन्म  २५ डिसेंबर १९२६ रोजी प्रयागराज येथे झाला.भारती यांनी पद्मश्री  सह  अनेक पुरस्कार  मिळविले होते.

साहित्य  : गुनाहो का देवता, सपना अभी भी , मानावामुल्य और साहित्य, ग्यारह सपनो का देश, पश्यंती

३. हरिवंश राय बच्चन 

अमिताभ बच्चन यांचे वडील, हरिवंश राय बच्चन हे साहित्य आंदोलनाचे भाग राहिले होते. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९०७ रोजी प्रयागराज येथे झाला.

साहित्य : मधुशाला, दशद्वार सोपान तक, निशा निमंत्रण, दो चटाने, मिलन यामिनी

४. महादेवी वर्मा 

महादेवी वर्मा यांनी हिंदी साहित्यावर स्वामित्व मिळविले. २६ मार्च १९०७ रोजी त्यांचा जन्म फरुखाबाद येथे झाला, त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण असे दोन्ही सन्मान मिळाले आहेत .

साहित्य : नीरजा, गिल्लू, पाठ के साथी, अतीत के चलचित्र, यामा, दीपशिखा, संस्मरण.

५. जयशंकर प्रसाद 

जयशंकर प्रसाद यांचा जन्म ३० जानेवारी १८८९ रोजी  झाला. जयशंकर प्रसाद म्हणजे  हिंदी रंगमंच आणि आधुनिक हिंदी साहित्याचे सर्वात प्रतिष्ठित व्यक्तित्वांपैकी एक होते.

साहित्य : कामयानी, धृवस्वमिनी, कंकाल, तितली, स्कंदगुप्त, लहर, ममता

६. सुर्यकांत त्रिपाठी

त्रिपाठी एक प्रसिद्ध कादंबरीकार , कथालेखक निबंध लेखक व कवी होते.  २१ फेब्रुवारी १८९९ रोजी मिदनापूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या सध्या लेखनशैलीची वेळोवेळी प्रशंसा केली गेली.

साहित्य : कुकुर्मुत्ता, निरुपमा, चातुरी चामर, अप्सरा, गीतिका, प्रभावती 

७. अम्रिता प्रीतम 

अमृता प्रीतम या एका कादंबरीकार, कवियत्री, आणि निबंधकार होत्या. त्यांनी मुख्यतः हिंदी आणि पंजाबी भाषेत लेखन केले. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९१९ रोजी गुजरावाला येथे झाला.

साहित्य : नागमणी, रसीदी टीकेट, मै तुम्हे फिर मिलुंगी, कैली कामिनी और अनिता, काल चेतना.