वायुप्रदूषण म्हणजे काय ? Air Pollution

वायुप्रदूषण म्हणजे काय ? Air Pollution

आपल्याला जीवन जगण्यासाठी ओक्सिजनची गरज असते जो आपल्याला शुद्ध हवेतून मिळतो. (वायुप्रदूषण)

पण वायुप्रदुशनामुळे  हवेत कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे सध्याच्या  काळात वायुप्रदूषण हि सर्वात मोठी समस्या बनली आहे.

  वायुप्रदूषण म्हणजे काय ? (Air Pollution) वायुप्रदुषणाची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल :

”सजीवांना हानिकारक असणारे विषारी घटक जेव्हा वातावरणात मिसळले जातात व वातावरणातील  या विषारी घटकांमुळे हवा साजिवांसाठी हानिकारक बनते तेव्हा वायुप्रदूषण झाले असे म्हणतात.”

हवा प्रदूषित करण्यास कारणीभूत असणारे घटक : 

1. कार्बन मोनाकसॉइड (Co)

      मानवी आरोग्यास अत्यंत घातक असणारा हा वायू इतका सहजपणे तयार होतो की आपल्याला त्याची जाणीवही होत नाही, वाहनांमधून निघणारा धूर, वीट भट्टी मध्ये जाळला जाणारा कोळसा व रबर यापासून निघणारा धूर इत्यादी पासून हा जीवघेणा वायू बाहेर पडतो.

नाकावाटे शरीरात जाऊन तो रक्तात सहजपणे मिसळला जातो व संपूर्ण शरीरात पसरतो. जास्त वेळ या वायूच्या संपर्कात राहिल्यास त्या सजीव प्राण्याचा मृत्यू होतो.

या वायूच्या सतत संपर्कात येत राहिल्याने चक्कर येणे, थकवा येणे, सतत डोके दुखणे यासारखी लक्षणे दिसायला लागतात.

2. सल्फर डायॉक्साईड (SO2)

       कोळसा किंवा रॉकेल यांच्या ज्वलनातून सल्फर चे ऑक्सीडेशन होते व त्यापासून सल्फर डायॉक्साईड हा वायू तयार होतो.

सल्फर डायॉक्साईड वायूचे प्रमाण हवेत खूप जास्त वाढून जेव्हा ते ढगांच्या संपर्कात येते त्यावेळी पाण्याच्या थेंबात मिसळून सल्फ्युरिक आम्ल तयार होते व  ”आम्लवर्षा ” होते. यामुळे पिकांचे, वनांचे व जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

3. नायट्रोजन ऑक्साईड व नायट्रोजन मोनॉक्साईड  (NO व NO2) : 

 अतिउच्च तापमानाला हवेतील नायट्रोजन चे ज्वलन होऊन नायट्रोजन ऑक्साईड  व नायट्रोजन मोनॉक्साइड तयार होतो. त्याचबरोबर वाहनांच्या धूरड्यामधून हा वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतो.

हा वायू मानवी शरीरात जावून तो मानवी फुफ्फुसांच्या कार्यप्रणालीवर परिणाम करतो व यामुळे कफ निर्मित जास्त होते व सर्दी होते. नेहमीची सर्दी व कफ यामुळे दमा होन्याची शक्यता वाढते.

वायुप्रदूषनाची कारणे ( स्रोत) :

नैसर्गिक कारणे ( स्रोत ) (Air Pollution)

AVvXsEhh6bIGgc24xUjyZR9E5v0qYbr1B4FsekGl7m wIKEL ejmFxck8XUKvVwtxWIGELdfHusoOQUuCqxCE8lvJJdj5JM C3WKGD9B6dQW5V8OcQnpKrdMtIRX4d7dFdQbV1jRfx bowAA2iwgwdk bVo8I4vO9K6fEH02C wVyw6pTS9WV7IpqoExOCQJA=w117 h175 वायुप्रदूषण म्हणजे काय ? Air Pollution

1. ज्वालामुखी : 

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मोठ्या प्रमाणावर सल्फर डायॉक्साईड, धूलिकण, वाफ, राख वातावरणात मिसळली जाते.

2. दलदल : 

जंगलात तयार होणाऱ्या दलदलीमध्ये मिथेन या वायूची निर्मिती होते. हा वायू ज्वलनास मदत करतो याशिवाय जंगलात लागणारे वणवे व त्यामुळे होणारा धूर यामुळे वातावरणात विषारी वायूची भर पडते.

 

मानवनिर्मित कारणे ( स्रोत )

1. वाहने : 

नायट्रोजन ऑक्साईड व नायट्रोजन डायॉक्साईड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायॉक्साईड व सूक्ष्म धूलिकण यांची निर्मिती ही वाहनांमुळे होते. जितकी जास्त वाहनाची संख्या वाढते तितकेच जास्त प्रमाणात या वायूंचे उत्सर्जन ही वाढते.

2. रासायनिक खते : 

 मोठ्या प्रमाणत होणारा रासायनिक खतांचा वापर यामुळे शेतजमिनी व पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होते.

3. पेट्रोलपंप : 

 पेट्रोलपंपा मुळे मोठ्या प्रमाणावर व्होलेटाईल ऑरगॅनिक कंपाऊंड (VOC) ची निर्मिती होते यातील काही घटक मानवी आरोग्यास घातक असतात.

वायुप्रदूषनाचे दुष्परिणाम :

आरोग्यावर होणारे परिणाम :

 वायुप्रदूषनाचा थेट परिणाम हा श्वसन संस्थेवर होतो. हवेतील विविध विषारी घटक फुफ्फुसात जावून फुफ्फुस कमजोर करतात व यामुळे कफनिर्मिती होवून दमा होण्याची संभावना बळावते.

 कार्बन मॉनॉक्साईड हा रक्तात हिमोग्लोबिन बरोबर मिसळून संपूर्ण शरीरभर पसरतो यामुळे अत्यंत गंभीर परिणाम होतात.

निसर्गावर होणारे दुष्परिणाम :

आम्ल वर्षेमुळे जंगले, शेतजमिनी, व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. आम्ल वर्शेमुळे जमिनी नापीक होतात. झाडांची पाने गळून जातात, पक्ष्यांची अंडी अकालीच फुटतात.

वायुप्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना : 

1. कारखान्यांमधून निघणारा धूर उंचावर सोडण्यासाठी नियम लागू केले आहेत पण आजही त्यांचे काटेकोर पालन होताना दिसत नाही. धुराचे नळकांडे काही उंचावर जाऊन तसेच सोडलेले पाहायला मिळतात. हा धूर वातावरणात सोडण्यापूर्वी त्याच्यावर प्रक्रिया कारणे गरजेचे आहे.

2. वाहनांमधून निघणाऱ्या धुरसाठी गाड्यांना फिल्टर्स लावले पाहिजे, विविध प्रकारचे जे कटलिक कन्वर्टर्स आहेत ते वापरायला पाहिजे.

3. अधिक प्रमाणत झाडे लावून ती वाढवली पाहिजेत त्यांचे संगोपन केले पाहिजे. 

वायुप्रदूषण ( Air Pollution) म्हणजे काय ?

 
4. शक्य होईल तितका वाहनाचा कमी वापर करायला हवा. सायकलचा वापर करावा जेणेकरून वाहनांच्या वापर कमी होईल . खाजगी वाहनापेक्षा बस, ट्रेन इत्यादींचा वापर करावा. 
 
 

संदर्भ : 

https://mr.m.wikipedia.org/