मोर निबंध | Peacock Essay in marathi

मोर निबंध  | Peacock Essay in marathi

माझा आवडता पक्षी मोर

               पावसाळ्यात पावसात थुई – थुई नाचणारा मोर सर्वांचाच आवडता आहे पण माझा सर्वात जास्त आवडता पक्षी आहे. नाच रे मोर हे गाणे आपण लहान पनापासूनच ऐकत आलो आहे. मोर दिसायला सुंदर, रुबाबदार, आणि त्याच्या डोक्यावर असणारा तुरा खूपच सुंदर दिसतो. मोराचा पिसारा झुपकेदार व खूपच सुंदर असतो. म्हणूनच मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.

 

                      मोराला पक्षांचा राजा असे म्हटले जाते. जेव्हा तो त्याचा रंगबिरंगी पिसारा फुलवून नाचतो तेव्हा त्याचाकडे बघतच रहावेसे वाटते. इतर पक्ष्यांच्या तुलनेने मोराचे वजन जास्त असते. तो आकाशात उंच उडू शकत नाही. हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे कारण तो शेतात्तील किडे, सरडे, उंदीर, साप यांना खावून पिकाचे रक्षण करतो.

 

                  मोर हा शंकराचा मुलगा कार्तिकेय चे वाहन आहे. श्रीकृष्ण सुधा त्याच्या केसात मोराचे पीसलावतो. मोराच्या पिसांचा वापर आपण शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी वापरतात. मोराचे सौदरर्य पाहून कवी रवींद्रनाथ टागोर म्हणतात 

 

हे मोर, तू मृत्यूची हि भूमी स्वर्गासारखी करायला आली आहेस

 

            हा एक लाजाळू पक्षी आहे. तो मनुष्यवस्तीपासून दूर जंगलात रहाणे पसंत करतो. मोर भारतात सर्वत्र आढळतात पण मुख्यत: राजस्थान, उत्तर प्रदेश, आणि मध्य प्रदेश माडे तो प्रामुख्याने आढळतो.

 

#  Peacock Essay | माझा आवडता पक्षी | Marathi Essay | मराठी निबंध