100+ Marathi Idioms (Sayings) | मराठी म्हणी

Marathi Idioms (Sayings) | मराठी म्हणी म्हणजे काय ?

Marathi Idioms (Sayings) | मराठी म्हणी म्हणजे एखाद्या मनुष्याला त्याच्या आयुष्यात येणारे विविध अनुभव एखाद्या छोट्या वाक्यात मांडून दाखविलेला असतो. अशी वाक्ये हळूहळू लोकांच्या सतत वापरात असतात.

for example : अति तेथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो.

लोकांच्या सतत म्हणण्यात येणारी म्हणून त्यांना ” म्हण ” असे म्हणतात.

Marathi Idioms (Sayings) | मराठी म्हणी
Marathi Idioms (Sayings) | मराठी म्हणी

मराठी भाषेतिल काही निवडक म्हणी खाली दिल्या आहेत त्यांचा अभ्यास करू.

  • अति शहाणा त्याला बैल रिकामा – वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते.
  • अंथरूण पाहून पाय पसरावे – आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
  • इकडे आड तिकडे विहीर – दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे.
  • उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग – अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्तन.
  • उथळ पाण्याला खळखळाट फार – ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो.
  • एका हाताने टाळी वाजत नाही – भांडणाचा दोष एका पक्षाकडेच असत नाही. 
  • ऐकावे जनाचे, करावे मनाचे – सर्वांचा विचार घ्यावा व आपणांस योग्य वाटेल ते करावे.
  • कर नाही त्याला डर नाही – ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही.
  • करावे तसे भरावे – जसे बरेवाईट कृत्य करावे तसे त्याचे बरेवाईट परिणाम भोगायला तयार व्हावे.
  • कावळ्याच्या शापाने गाई मरत नसतात – क्षुद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काही नुकसान होत नाही.
  • कोल्हा काकडीला राजी – क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात.
  • कोळसा उगाळावा तितका काळाच – वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते.

Also read : Marathi Idioms | मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | मराठी वाक्प्रचार | समानार्थी शब्द

म्हणींचे मराठी भाषेतील महत्व

वाक्प्रचार व म्हणी यांमुळे भाषा संपन्न होते व त्यांचा अभ्यास केल्यामुळे भाषेतील सौंदर्य समजण्याला मदत होते.

कोणतीही कल्पना साध्या, सरळ पद्धतीने न मांडता ती वाक्संप्रदाय किंवा म्हण या स्वरूपात मांडल्यामुळे भाषा किती सुंदर व प्रभावी होते हे दिसून येते.

  • टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येत नाही – अपरंपार कष्ट केल्यावाचून वैभव प्राप्त होत नाही.
  • तळे राखील तो पाणी चाखील – आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा प्रत्येक मनुष्य थोडा तरी फायदा करून घेतोच.
  • थेंबेथेंबे तळे साचे – थोडे थोडे जमवीत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो.
  • दाम करी काम – पैशाने सर्व कामे साध्य होतात.
  • दिव्याखाली अंधार – मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच.
  • दुरून डोंगर साजरे – कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते.
  • नाचता येईना अंगण वाकडे – आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.
  • नावडतीचे मीठ अळणी – नावडत्या माणसाने काहीही केले करी ते वाईटच लागते.
  • पळसाला पाने तीनच – कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच.
  • पाचा मुखी परमेश्वर – पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे.
  • पुढच्यास ठेच मागचा शहाणा – दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो.
  • पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा – द्यावयाचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र चोपून घ्यावयाचे.
  • बळी तो कान पिळी – ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाजवतो.
  • बुडत्याचा पाय खोलात – अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते.
  • भित्या पाठी ब्रह्मराक्षस –  भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात.
  • मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची  – धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही.
  • मुलाचे पाय पाळण्यात दिसतात – मुलगा मोठेपणी कसा निघेल याचा अंदाज लहानपणाच्या कृत्यावरून करता येतो.
  • वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकांत अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते.
  • शहाण्याला मार शब्दाचा – शहाण्याला शब्दाने सांगितले, मूर्खाला छडीशिवाय भागत नाही. की तो उमजतो पण
  • शितावरून भाताची परीक्षा – एखाद्या अंशावरून सगळ्या पदार्थाची परीक्षा करता येते.
  • साखरेचे खाणार त्याला देव देणार – भाग्यवान माणसाला देवही अनुकूल होतो. त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतात.
  • हजीर तो वजीर – जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो.

वरील म्हणी (Idioms) अभ्यासल्या असता असे जाणवते त्या शब्दांना किंवा वाक्प्रचारांना परंपरेने ते अर्थ प्राप्त झालेले आहेत.

PNGLAB.IN

1 thought on “100+ Marathi Idioms (Sayings) | मराठी म्हणी”

Comments are closed.