नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेखात आपण मराठी व्याकरणातील एकवचन आणि अनेकवचन( Singular and Plural Words ) शब्दांच्या जोड्या अभ्यासणार आहोत.
पुल्लिंगी नामांची अनेकवचने
For Example : पुढील नामांची रूपे पाहा :
एकवचन व अनेकवचन
- कुत्रा – कुत्रे
- आंबा – आंबे
- घोडा – घोडे
- ससा – ससे
- रस्ता – रस्ते
- लांडगा – लांडगे
- मुलगा – मुलगे
- फळा – फळे
- राजा – राजे
यावरून असे म्हणता येईल, की अकारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एकारान्त होते.
as follows पुढील नामांची रूपे पाहा :
- देव – देव
- शत्रू – शत्रू
- तेली – तेली
- उंदीर – उंदीर
- लाडू – लाडू
- गहू – गहू
- कवी – कवी
- फोटो – फोटो
नियम – आकारान्ताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामांची रूपे दोन्ही वचनांत सारखीच असतात.
पुल्लिंगी नामांमध्ये आकारान्त नामांचे अनेकवचन वेगळे असते. मराठी ए, ऐ व औ अन्तांची पुल्लिंगी नामे नाहीत.
स्त्रीलिंगी नामांची अनेकवचने
पुढील नामांची अनेकवचने पाहा :
- वेळ – वेळा
- केळ – केळी
- विहीर – विहिरी
- वीट – विटा
- भिंत – भिंती
- म्हैस – म्हशी
- चूक – चुका
- तारीख – तारखा
- सून – सुना
नियम अकारान्त स्त्रीलिंगी नामाचे एकवचन केव्हा आ-कारान्त होते तर केव्हा ई-कारान्त होते. ‘य’ नंतर ई आल्यास उच्चारात य चा लोप होतो.
in the same way उदा. गाय- गायी-गाई, सोय-सोयी-सोई
पुढील नामांची अनेकवचनांची रूपे पाहा :
- भाषा – भाषा
- पूजा – पूजा
- दिशा – दिशा
- आज्ञा – आज्ञा
- सभा – सभा
- विद्या – विद्या
आ-कारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेकवचन एकवचनासारखेच राहते.
उदा.
- नदी – नद्या
- बी – बिया
- स्त्री – स्त्रिया
- काठी – काठ्या
- भाकरी – भाकऱ्या
- लेखणी – लेखण्या
- टाकी – टाक्या
- गाडी – गाड्या
- उडी – उड्या
Similarly पुढील शब्दांची रूपे पाहा :
- सासू – सासवा
- पिसू – पिसवा
- जाऊ – जावा
- जाऊ – जावा
- जळू – जळवा
- ऊ – ऊवा
नियम – उ-ऊ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वा-कारान्त होते. (अपवाद – वाळू, बस्तू, बाजू)
(६) ओ-कारान्त स्त्रीलिंगी शब्द – प्रचारात असलेला
बायको असून त्याचे अनेकवचन बायका असे होते.
नपुंसकलिंगी नामांचे अनेकवचन
पुढील शब्दांची रूपे पाहा :
- घर – घरे
- फूल – फुले
- माणूस – माणसे
- दार – दारे
- शेत – शेते
- घड्याळ – घड्याळे
नियम – अ-कारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन ए-कारान्त होते.
पुढील शब्दांची रूपे पाहा :
For Example :
मोती – मोत्ये
मिरी – मिरे
नियम – ई-कारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन ए-कारान्त होते व विकल्पाने ‘य’ हा आदेश होतो. (अपवाद – पाणी, लोणी, दही, अस्थी)
(३) पुढील शब्दांची रूपे पाहा :
- पाखरू – पाखरे
- वासरू – वासरे
- लिंबू – लिंबे
- गळू – गळवे
- पिलू – पिले
उ-ऊ-कारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन ए-कारान्त होते. क्वचित प्रसंगी ते वे-कारान्त होते.
आसू – आसवे
Also Read :
1 thought on “एकवचन – अनेकवचन”
Comments are closed.