प्रयोग ( Prayog) | मराठी व्याकरण

नमस्कार मित्रांनो मराठी व्याकरणामध्ये हा भाग खूप महत्वाचा आहे, आजच्या लेखात आपण प्रयोग म्हणजे काय ? प्रयोगाचे प्रकार विस्तृतपणे अभ्यासणार आहोत.

‘प्रयोग’ म्हणजे काय ?

एखाद्या वाक्यातील कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्पर संबधाला ‘प्रयोग‘ असे म्हणतात.

प्रयोग हा शब्द संस्कृत ‘प्र-युज’ (योग) यापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ जुळणी किंवा रचना असा आहे.

कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकारांत “प्रयोग” असे म्हणतात.

प्रयोग | (Prayog)
(Prayog) | आतामराठी.इन | atamarathi.in

प्रयोगाचे एकूण प्रकार किती ?

प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत ते खालीलप्रमाणे :

  1. कर्तरी प्रयोग
  2. कर्मणी प्रयोग
  3. भावे प्रयोग

कर्तरिप्रयोग

  • तो गाणे गातो.
  • तू गाणे गातोस.
  • ती गाणे गाते.
  • ते गाणे गातात.

वरील वाक्यात तो, तू, ती, ते हे कर्ते आहेत, आणि ‘गाणे’ हे कर्म आहे आणि गातो, गाते, गातात, गातोस हि क्रियापदे आहेत.

प्रत्येक वाक्यांमध्ये जेव्हा जेव्हा कर्त्याचे लिंग बदलते तेव्हा क्रियापद हे कर्त्याच्या लिंगाप्रमाणे बदलते.

कर्तरीप्रयोगातील क्रियापद सकर्मक असले तर त्यास ‘सकर्मक कर्तरीप्रयोग’ म्हणतात व क्रियापद हे ‘अकर्मक’ असल्यास त्यास ‘अकर्मक कर्तरिप्रयोग’ असे म्हणतात.

For Example : १) ती गाणे गाते (सकर्मक कर्तरिप्रयोग)

२) ती घरी जाते (अकर्मक कर्तरिप्रयोग)

कर्मणी प्रयोग

  • मुलाने आंबा खाल्ला

वरील वाक्यात मुलाने हे कर्म आहे आणि आता वाक्यातील कर्त्याचे लिंग व वचन बदलून पाहू मुलाने एवजी मुलीने केले तरी क्रियापदाचे रूप “खाल्ला” असेच राहते म्हणून हा कर्तरीप्रयोग नाही.

  • मुलाने चिंच खाल्ली.

आंबा ऐवजी ‘चिंच’ हे स्त्रीलिंगी कर्म ठेवले असता क्रियापदाचे रूप खाल्ली असे होते. म्हणजेच वरील वाक्यात कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते म्हणून हा कर्मणीप्रयोग आहे.

कर्मणीप्रयोगाची काही उदाहरणे बघू :

for Example :

  • सुनीताने काकडी खाल्ली.
  • तिने गाणे म्हटले.
  • मला हा डोगर चढवतो.

भावेप्रयोग

मुलाने बिलास मारले.

वरील वाक्यातील कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग बदलले असता, मुलाने ऐवजी मुलीने असे केल्यास क्रियापदाचे रूप मारले असेच राहते.

बैलास या कर्मायेवजी गाईस असे स्त्रीलिंगी रूप किंवा बैलांना असे अनेकावचनी रूप जरी ठेवलेतरी क्रियापदाच्या रुपात बदल होत नाही. ते ‘मारले’ असेच राहते.

जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणेबदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस ” भावेप्रयोग” असे म्हणतात.

Also Read :

Download Images pnglab.in
Download free PNG IMages

1 thought on “प्रयोग ( Prayog) | मराठी व्याकरण”

Comments are closed.