सागरी कासव | sea turtle in marathi
सागरी कासवे मुख्यत्वेकरून समुद्रात व समुद्रकिनाऱ्यावर आढळून येतात. समुद्रातील पानगवत, गोगलगायी, झिंगे, लहान लहान मासे, तसेच समुद्री खेकडे हे कासवांचे आवडते अन्न आहे.
सागरी कासव हे वर्षभर हालचाल करत असतात. तर जमिनीवर राहणारी कासवे हिवाळ्यात वा उन्हाळ्यात बेडकांप्रमाने चिखलात निष्क्रिय पडून असतात व आराम करतात.
प्रजननाच्या बाबतीत मादी तिच्या विणीच्या काळात समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत तिच्या मागील पायांनी खड्डा करते व त्यात अंडी घालते. मादी एका वेळी सुमारे 500 अंडी घालते व नंतर तो खड्डा पुन्हा वाळूने बुजवून टाकते.
सुमारे 2 ते 3 महिन्यानंतर या अंड्यातून पिल्ले बाहेर येतात व समुद्रात जातात पण यामध्ये खूपच कमी कासवाची पिल्ल समुद्रापर्यंत पोचतात कारण या वाटचालीत समुद्रपक्षी व कावळ्यांची ते शिकार होतात यातून जे बचवतात ते मोठे होऊन सुमारे 100 वर्षापर्यंत जगतात.
अजून फोटो आहेत का ?
Ekdm mast ajun asech post tak