समूहदर्शक शब्द | Collective Nouns म्हणजे काय ?
ज्या शब्दांमधून आपल्याला समूह असल्याचा बोध होतो, अशा शब्दांना समूह्दर्शक शब्द | Collective Nouns असे म्हणतात.
आजच्या लेखात आपण मराठी भाषेतील समूहदर्शक शब्द | Collective Nouns यांचा अभ्यास करणार आहोत.
तलाठी भारती, वनरक्षक परीक्षा, इयत्ता ५ वी ते ८ वी शिष्यवृत्ती (Scholarship), विविध स्पर्धा परीक्षा यासाठी समूह्दर्शक शब्द खूप म्हत्वाचे ठरतात.
For Example. – भाषण करण्याची जागा – व्यासपीठ
After That अजून काही शब्दसमूहांच्या जोड्या पाहू.
- आधी जन्मलेला – अग्रज
- मागून जन्मलेला – अनुज
- पूर्वी कधी न पाहिले/ऐकले असे – अपूर्व
- ज्यास कोणीही शत्रू नाही असा – अजातशत्रू
- तिथी वार न ठरवता आलेला – अतिथी / आगंतुक
- थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुष्ट
- अनेक गोष्टींत एकाच वेळी लक्ष देणारा – अष्टावधानी
- पायापासून डोक्यापर्यंत – आपादमस्तक
- बालांपासून वृद्धांपर्यंत – आबालवृद्ध
- देव आहेस मानणारा – आस्तिक
- अगदी पूर्वीपासून राहणारे – आदिवासी
- उदयाला येत असलेला – उदयोन्मुख
- श्रम न करता खाणारा – ऐतोबा / ऐतखाऊ
- लहानग्यांना झोपविण्यासाठीचे गाणे – अंगाईगीत
- राष्ट्राराष्ट्रांतील – आंतरराष्ट्रीय
- धान्यादि साठविण्याची बंदिस्त जागा – गोदाम / कोठार / वखार
- केलेले उपकार जाणणारा – कृतज्ञ
- केलेले उपकार न जाणणारा – कृतघ्न
- कर्तव्याकडे पाठ फिरविणारा – कर्तव्यपराङ्मुख
- इच्छिलेली वस्तू देणारे झाड – कल्पवृक्ष
- इच्छिलेली वस्तू देणारी गाय – कामधेनू
समूहदर्शक शब्द | Collective Nouns म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरणे होय.
- कवितेची रचना करणारी – कवयित्री
- आकाशात गमन करणारा – खग
- मूर्ती जेथे असते तो देवालयातील भाग – गाभारा
- सैन्याची चक्राकार केलेली रचना – चक्रव्यूह
- जाणून घेण्याची इच्छा असणारा – जिज्ञासू
- चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चव्हाटा / चौक
- जिवाला जीव देणारा – जिवलग
- नाणी पाडण्याची जागा – टाकसाळ
- शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज – तगाई
- किल्ल्याच्या भोवतीची भिंत – तट
शब्द्समुह्दर्शक शब्दांच्या जोड्या.
- हालअपेष्टा सहन करण्याचा गुण – तितिक्षा
- तीन रस्ते एकवटतात ती जागा – तिठा
- खूप दानधर्म करणारा – दानशूर
- दोनदा जन्मलेला – द्विज
- दररोज प्रसिद्ध होणारे – दैनिक
- अस्वलाचा खेळ करणारा – दरवेशी
- तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट – दंतकथा
- तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश – द्वीपकल्प
- दोन नद्यामधील जागा – दुआब /दोआब
- दैवावर भरवसा ठेवून राहणारा – दैववादी
- उचावरून पडणारा पाणलोट – धबधबा
- एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे – धर्मान्तर
अन्न व नागरी पुरवठा विभाग भरती २०२३ साठीच्या अभ्यासक्रमासाठी Similarly अजून काही (Collective Nouns) समूह्दर्शक शब्दांच्या जोड्या अभ्यासू.
- देव नाहीसे मानणारा – नास्तिक
- कुणाचाही आधार नसलेला – निराधार
- घरादारास व देशास पारखा झालेला – निर्वासित
- पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत – नखशिखान्त
- नाटकात भूमिका करणारा पुरुष – नट in short अभिनेता
- एकमेकांवर अवलंबून असणारे – परस्परावलंबी
- पुरामुळे नुकसान झालेले लोक – पूरग्रस्त
- पाहण्यासाठी जमलेले लोक – प्रेक्षक
- पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे – पाक्षिक
समूह्दर्शक शब्द | Collective Nouns | Samuhdarshak Shabd म्हणजे काय ?
वरील वाक्यात जेथे भाषण केले जाते या संपूर्ण वाक्यासाठी एक शब्द वापरला जातो म्हणजे “व्यासपीठ” होय. अशाच विविध शब्द्समुहासाठी वापरले जाणारे शब्द म्हणजे समूहदर्शक शब्द | समूह्दर्शक शब्द असे म्हणतात.
- मोफत पाणी मिळण्याची सोय – पाणपोई
- गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा – पाणवठा
- तिथी, वार, नक्षत्र, योग, करण यांची पुस्तिका – पंचाग
- शत्रूला सामील झालेला – घरभेदी
- डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता – बोगदा
- निरपेक्ष कामाबद्दल दिलेले सन्मानाचे धन – मानधन
- मोजके असे बोलणारा – मितभाषी
- लग्न झालेल्या मुलींच्या आईबापाचे घर – माहेर
- दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा – मनकवडा
- अचूक गुणकारी असणारे – रामबाण
- लिहिण्याची हातोटी – लेखनशैली
- भाषण करण्याची जागा – व्यासपीठ
वरील सर्व शब्द (Above all Words) अभ्यासल्या नंतर As Result समूहदर्शक शब्द म्हणजे काय त्याची कल्पना आली असेल अधिक अभ्यासासाठी खालील शब्द अभ्यासा.
- भाषण करण्याची कला – वक्तृत्व
- दुपारच्या जेवणानंतरची अल्प झोप – वामकुक्षी
- पती मरण पावला आहे अशी स्त्री – विधवा
- ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष – विधुर
- दगडावर केलेले कोरीव काम – शिल्प
- दगडावर कोरलेला लेख – शिलालेख
- शंकराची उपासना करणारा – शैव
- दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा – संगम
- स्वतःशी केलेले भाषण – स्वगत
- स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा – अप्पलपोटा
Also Read : राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ | NCF 2005
- समाजात समता नांदावी असे म्हणणारा – साम्यवादी
- नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत – नांदी
- दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास – सुस्कारा
- देशासाठी प्राणार्पण केलेला – हुतात्मा
- शत्रूकडील बातमी काढून आणणारा – हेर Or खबऱ्या
- हृदयाला भिडणारे – हृदयस्पर्शी
- जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा – क्षितिज
समूहदर्शक शब्द PDF डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या Download PDF बटनावर क्लिक करा.
3 thoughts on “१००+ समूहदर्शक शब्द | Collective Nouns in Marathi Language”
Comments are closed.