समानार्थी शब्द | Marathi Synonyms | Marathi Samanarthi shabd स्पर्धा परीक्षेसाठी जसे MPSC, फोरेस्ट भारती, PSI, स्कोलारशीप अशा विविध परीक्षामध्ये समानार्थी शब्द ५ ते १० गुणांसाठी येतातच.
(Synonym In Marathi) समानार्थी शब्द म्हणजे काय ? समानार्थी शब्दाची व्याख्या.
मराठी भाषेमध्ये एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरला जातो त्या शब्दाला समानार्थी (Synonym) शब्द असे म्हणतात.
For Example. – हात या शब्दासाठी कर, हस्त, पाणि, भूज, बाहु हे शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरले गेले आहेत
त्यात आज आपण काही मराठी शब्द व त्यांचे समानार्थी शब्द (Synonyms) अभ्यासणार आहोत.
- अमृत – सुधा, पियूष
- अनल – विस्तव, पावक, अग्नी, वन्ही
- अश्व – घोडा, हय, वारू, वाजी, तुरंग
- अरण्य – रान, कानन, वन, विपिन, जंगल
- काळोख – अंधार, तीमिर, तम
- काळजी – चिंता, विवंचना, फिकीर
- कावळा – काक, वायस, एकाक्ष
- कमळ – राजीव, अंबुज, पंकज, सरोज, पदम
- आश्चर्य – नवल, अचंबा, विस्मय
- आनंद – हर्ष, मोद, संतोष
- आकाश – गगन, अंबर ख आभाळ
- आई – माता, जननी ,माय ,माऊली
- अही – साप ,स्पर्श ,भुजंग
- दैत्य – दानव ,राक्षस ,असुर
- देव – सुर ,ईश्वर ,अमर, निर्मिक
- देऊळ – मंदिर ,देवालय, राऊळ
- दूध – पय, शीर ,दुग्ध
- दिवस – वार ,वासर, वदन
- तलाव – तडाग, सरोवर, कासार
- झाड – तरु ,वृक्ष ,पादप, दृम
- जमीन – भुई ,भूमी,
- चांदणे – ज्योत्स्ना ,चंद्रिका , कौमुदी
- चंद्र – इंदू ,सुधाकर ,हिमांशू ,रजनीनाथ, शशी
- घर – सदन ,भवन ,गृह ,आलय, निकेतन
- खल – दृष्ट ,नीच ,दुर्जन
above all are Synonyms in Marathi Language
काही वेळा एका शब्दासाठी एकच समानार्थी शब्द (Marathi Synonyms) असतो तर काही वेळा एका शब्दासाठी २ किंवा अधिक शब्द असतात.
- धनुष्य – धनू, चाप, कोदंड, कार्मुक –
- नदी – सरिता, तटिनी, तरंगिणी
- नमस्कार प्रणिपात – वंदन, अभिवादन, नमन,
- नवरा – पती, कांत, भर्ता, धव, भ्रतार
- पत्नी – भार्या, बायको, कांता, दारा,जाया
- पर्वत – नग, अभी, शैल, गिरी
- पक्षी – खग, विहग, द्विज, अंडज
- पाणी – जल, अंबू, पय, उदक, जीवन, सलिल, वारी
- पान – पर्ण, पत्र, पल्लव
- पाय – पद, पाद, चरण
- पृथ्वी – धरणी, अवनी, भूमी, धरती,
- वसुंधरा, क्षमा
- पोपट – राघू, रावा, शुक
- फूल – पुष्प, सुमन, कुमुद, सुम
- बाग – बगीचा, उद्यान, उपवन
Also Read – मराठी वाक्प्रचार
- बाप – पिता, वडील, जनक
- भाऊ – भ्राता, बंधू, सहोदर्र
- भुंगा – भ्रमर, अली, मिलिंद, मधुप
- मित्र – दोस्त, सखा, सोबती
- मुलगा – पुत्र, सुत, नंदन, तनुज
- मुलगी – सुता, तनया, आत्मजा, नंदिनी
- डोके – शिर, मस्तक, माथा
- डोळा – नयन, लोचन, चक्षु, नेत्र
- डौल – ऐट, दिमाख, रुबाब
- ढग – जलद, पयोधर, घन, मेघ, अभ्र
- युद्ध – रण, समर, संगर, संग्राम, लढाई
- रस्ता – वाट, पथ, पंथ, मार्ग
Download Images for your projects free
- राजा – भूप, नृप, नरेश, भूपाल, पृथ्वीपती
- रात्र – रजनी, यामिनी, निशा
- लक्ष्मी – श्री, रमा, कमला, इंदिरा, वैष्णवी
- वस्त्र – पट, अंबर, वसन, कपडा
- वानर कपी, मर्कट, शाखामृग
- वारा – अनिल, पवन, वायू, समीरण
- वीज – चपला, तडित, बिजली, सौदामिन
- शत्रू – अरी, रिपू, वैरी, दुष्मन
- समुद्र – सागर, सिंधू, अर्णव, रत्नाकर
- सिंह – केसरी, पंचानन, मृगेंद्र, वनराज
- स्त्री- ललना, महिला, वनिता, नारी, अबला
- सूर्य – मित्र, रवी, आदित्य, सविता, भानू, भास्कर
- सोने – कनक, सुवर्ण, हेम, कांचन
- हत्ती – गज, कुंजर, सारंग, नाग
- हात – कर, हस्त, पाणि, भुज, बाहू
- क्षय – क्षीणपणा, नाश, हास
- ज्ञानी – शहाणा, डोळस, जाणकार
Also Download समानार्थी शब्द | Marathi Synonyms | Marathi Samanarthi shabd PDF Click Button
4 thoughts on “समानार्थी शब्द | Marathi Synonyms”
Comments are closed.