कोर्स २०१ : व्यवस्थापन

 

व्यवस्थापन म्हणजे  काय ?

सर्वप्रथम शैक्षणिक व्यवस्थापन हि व्याख्या १८८० साली शिक्षण क्षेत्रात ‘ प्रक्टीकॅल handbook ऑफ  स्कूल मनेजमेंट’

या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे उदयास आली. शैक्षणिक व्यवस्थापन हि अध्ययनमुल्ये वर्तन संसाधने आणि उद्दिष्टांच्या सहाय्याने माहिती, ज्ञान आणि कौशल्यांची प्रगती करण्याची प्रक्रिया आहे. 

व्यवस्थापनाचा अर्थ :

उत्कृष्ट व्यवस्थापन म्हणजे कार्यात रेखीवपणा, शिस्त, तत्परतेने साधलेले संभाषण, कुशल संघटना, सहकार्य, जागरुक नेतृत्व या सर्व गोष्टींचा उत्कृष्ट पद्धतीने ताळमेळ घालणे म्हणजे व्यवस्थापन होय. 

        या व्यवस्थापनामुळे विविध कलात्मक गोष्टींचा आविष्कार होतो. या व्यवस्थापनाचा उपयोग शालेय स्तरावर अनेक ठिकाणी करता येतो, या व्यवस्थापनामध्ये निश्चित करण्यात आलेली ध्येये, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, संपत्ती, वेळ या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने सांगड घालून ध्येय साध्य करणे म्हणजे व्यवस्थापन होय.

व्यवस्थापनाची व्याख्या :

व्यवस्थापानाच्या विविध विचारवंतांच्या नुसार विविध व्याख्या बघता येतील, त्या पुढीलप्रमाणे

व्यवस्थापन

 

 

१) हेन्री फेयॉल

  हेन्री फेयॉल यांच्या नुसार व्यवस्थापणाची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल,

”कार्याचे नियोजन व संगठन करणे, सर्व कार्यामध्ये समन्वय साधने आणि कार्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे व्यवस्थापन होय”.

 

 

२) जॉर्ज आर. टेरी

       जॉर्ज आर. टेरी यांच्या नुसार व्यवस्थापणाची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल,

व्यवस्थापन म्हणजे लोकशाही आणि साधनसंपत्तीचा वापर करून काही उद्दिष्टे निश्चित करून ती साध्य करण्यासाठी एखाद्या संस्थेच्या कार्याचे नियोजन, संघटना, प्रकटीकरण आणि नियंत्रण करण्याची विशिष्ट प्रक्रिया होय”.

 

३) जेम्स

             जेम्स म्हणतात कि, 

व्यवस्थापन हे व्यक्तीविषयक नसून ते व्यक्तिगत व्यवस्थापन आहे”.

 

कोर्स २०१ : व्यवस्थापन

४) स्टेनले व्हान्स

        स्टेनले व्हान्स यांच्या नुसार व्यवस्थापणाची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल,

”पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी निर्णय घेण्याची, तसेच  उपक्रमात कामकरणाऱ्या व्यक्तीच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची क्रिया म्हणजे व्यवस्थापन होय”.

 

शैक्षणिक व्यवस्थापनाचा अर्थ :

शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे काय ?

         ”शैक्षणिक संघटनांद्वारे किंवा संस्थांद्वारे शिक्षण क्षेत्रासंबंधी व्यवस्थापनात्मक दृष्टीने केले जाणारे कार्य म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन होय. ”

         शैक्षणिक व्यवस्थापन ही संकल्पना एका घटकासंदर्भात नसून त्यामध्ये आर्थिक, राजकीय, वैज्ञानिक आणि समाजशास्त्रीय घटकांचा समावेश होतो. या क्षेत्रांच्या संघटित कार्याद्वारे शैक्षणिक व्यवस्थापन केले जाते. शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत घडणाऱ्या सर्व क्रिया दर्शविल्या जातात. शैक्षणिक व्यवस्थापन हे शिक्षण क्षेत्रात नियोजन, कार्य, प्रात्यक्षिक कार्य आणि अनुदेशन कार्याद्वारे न करता अभ्यासशास्त्रीय दृष्टिकोनाद्वारे केले जाते.

 

शैक्षणिक व्यवस्थापनाची व्याख्या :

इंटरनॅशनल डिक्शनरी ऑफ एज्युकेशन (१९७८) जी जेरी ॲण्ड जे.बी. थॉमस यांच्या नुसार शैक्षणिक व्याव्स्थापनाची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येते,

       “शैक्षणिक व्यवस्थापन हे शिक्षण क्षेत्रातील स्थापित आणि कार्यप्रणित प्रशासन आणि संघटनांसबंधी सैद्धांतिक आणि कार्यान्वित दृष्टिकोन मांडते.

२) जॉर्ज आर. टेरी

       जॉर्ज आर. टेरी यांच्या नुसार शैक्षणिक व्यवस्थापणाची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल,

“शैक्षणिक व्यवस्थापन ही सुस्पष्ट प्रक्रिया आहे. त्यामध्ये मानवी व इतर संसाधनांचा वापर करून नियोजन, संघटन, सुसूत्रता व नियंत्रणाद्वारे निश्चित आणि अपूर्ण अशा शैक्षणिक उद्दिष्टांची पूर्तता करण्याचे कार्य केले जाते.”

 

३) पॉल मोनोरोई

      पॉल मोनोरोई  यांच्या नुसार शैक्षणिक व्यवस्थापणाची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल,

“शालेय व्यवस्थापन हे शैक्षणिक सिद्धांत, वर्गअध्यापन पद्धती संबंधी, तंत्रासंबंधीची तत्त्वे आणि नियम व यशस्वी शिक्षकांविषयी कार्य करणारे एक व्यवस्थापकीय स्वरूपाचे कार्य आहे.”

३) शेली उमाना

      शेली उमाना  यांच्या नुसार शैक्षणिक व्यवस्थापणाची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल,

व्यवस्थापन हे शिस्तबद्ध, प्रणालीबद्ध वैचारिक दृष्टिकोनातून केले जाते. यामध्ये काय करणे ? कशा प्रकारे करणे ? आणि आपण ते कसे करावे ? या कार्यरत नियम किंवा अटींचा समावेश होतो. व्यवस्थापन हे एक आवरण नसून एक कार्यपद्धती आहे. चांगले नियोजीत व्यवस्थापन हे शिक्षण आणि समाज यांच्या एकीकरणासंबंधीची परिणामकारकता दर्शविते”

 

 संदर्भ  : शालेय शिक्षणाची गुणवत्ता आणि व्यवस्थापन  (सक्सेस पब्लिकेशन )