संधी | स्वरसंधी | व्यंजनसंधी | विसर्गसंधी

एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात व त्यांचा एक जोडशब्द तयार होतो. वर्णांच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास ‘संधी’ असे म्हणतात.

संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. संधी म्हणजे सांधणे, जोडणे होय.

जवळ जवळ येणाऱ्या दोन वर्णापैकी दोन्ही व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तेव्हा त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात. व्यंजन + व्यंजन किंवा व्यंजन + स्वर असे त्याचे स्वरूप असते.

संधी | Sandhi | Atamarathi.in

संधीचे प्रकार

संधीचे एकूण ३ प्रकार पडतात ते खालीलप्रमाणे

 • स्वरसंधी
 • व्यंजनसंधी
 • विसर्गसंधी

स्वरसंधी म्हणजे काय ?

एकमेकांशेजारी येणारे वर्ण (अक्षरे) हि जर “ने” या अक्षराने जोडले असतील तर तेथे जी संधी होते तिला “स्वरसंधी” असे म्हणतात.

स्वरसंधीची काही उदाहरणे पाहू (For Example)

 • मुनी + इच्छा = मुनीच्छा
 • देव + आलय = देवालय
 • सूर्य + अस्त = सूर्यास्त
 • विद्या + अर्थी = विद्यार्थी
 • महिला + आश्रम = महिलाश्रम
 • चंद्र + उदय = चंद्रोदय

व्यंजन संधी म्हणजे काय ?

जवळ – जवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल अशा वेळी जी संधी होते त्यास व्यंजन संधी असे म्हणतात.

व्यंजन संधी मध्ये एकतर : व्यंजन + व्यंजन किंवा व्यंजन + स्वर असे स्वरूप पाहायला मिळतेॉ

आता अभ्यासासाठी काही उदाहरणे (Example) पाहू.

 • विपद् + काल : द् + क् = त् + क् = त्क = विपत्काल
 • सत् + आचार : त् + आ = द् + आ = दा = सदाचार
 • षट् + रिपू : ट् + र् = ड् + र = ड्र = षड्रिपू
 • जगत् + नाथ : त् + न् = न् + न् = जगन्नाथ
 • सत् + मती : त् + म् = न् + म् = सन्मती

विसर्ग संधी

विसर्ग हा स्वतंत्र स्वर नसून तो स्वरादी आहे, हे आपण पाहिले. त्यामुळे कोणत्या तरी स्वरानंतर तो येतो. जसे अ + विसर्ग = अ:

विसर्गसंधी मध्ये एकत्र येणाऱ्या वर्णांतील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा त्याला विसर्गसंधी असे म्हणतात.

संधीची काही उदाहरणे | Some Examples

 • ज्ञान + ईश्वर = ज्ञानेश्वर
 • सह + अनुभूती = सहानुभूती
 • प्रश्न + उत्तर = प्रश्नोत्तर
 • पर + उपकार = परोपकार
 • हर + एक = हरेक
 • प्रति + अक्ष = प्रत्यक्ष
 • धारा + उष्ण = धारोष्ण
 • अयोध्या + ईश = अयोध्येश
 • जगत् + ईश्वर = जगदीश्वर

हे पण वाचा : समानार्थी शब्द | Marathi Synonyms | Marathi Samanarthi shabd

 • जगत् + जीवन = जगज्जीवन
 • भगवत् + गीता = भगवद्गीता
 • भाषा + अंतर = भाषांतर
 • मत् + माता = मन्माता
 • दिक् + अंतर = दिगंतर
 • यथा + इष्ट = यथेष्ट
 • निः + इच्छ = निरिच्छ
 • सत् + मती = सन्मती
 • अन्य + उक्ती = अन्योक्ती
 • चंद्र + अस्त = चंद्रास्त
 • अल्प + आहार = अल्पोपहार
Download Images pnglab.in
Download free PNG IMages

पुढील संधी सोडवा :

 • परि + ईक्षा = परीक्षा
 • दीर्घ + उत्तरी = दीर्घोत्तरी
 • वन + औषधी = वनौषधी
 • प्रति + अंतर = प्रत्यंतर
 • चिंता + आतुर = चिंतातुर
 • नील + आकाश = नीलाकाश
 • लंका + अधिपती = लंकाधिपती
 • गुरु + आज्ञा = गुर्वाज्ञा
 • वि + आसंग = व्यासंग

Also Read : बौद्धिक अक्षमता (Mental Retardation)

 • भगवत् + भक्ती = भगवद्भक्ती
 • भगवत् + नाम = भगवन्नाम
 • हेतु + आभास = हेत्वाभास
 • सम् + आलोचन = समालोचन
 • पुनः + आगमन = पुनरागमन
 • आयुः + वेद = आयुर्वेद
 • धनुः + वात = धनुर्वात
 • उत् + ज्ज्वल = उज्ज्वल
 • गण + ईश + उत्सव = गणेशोत्सव
 • सत् + चित् + आनंद = सच्चिदानंद

Also Read : प्रयोग ( Prayog) | मराठी व्याकरण

संधी शब्दाची PDF Download करण्यासाठी पुढे दिलेल्या Download बटनावर Click करा.

104 KB

1 thought on “संधी | स्वरसंधी | व्यंजनसंधी | विसर्गसंधी”

Comments are closed.