आजच्या लेखात आपण शाळांचे प्रकार (Type of Schools) यांचा अभ्यास करू. CTET 2024 परीक्षेसाठी IMP विषय असल्यामुळे यावर विशेष लक्ष केंद्रित करावे.
कोर्स २०३ : शाळा आणि सर्व समावेशक शाळा (203 – SCHOOL AND INCLUSIVE SCHOOL)
सर्व समावेशक शाळा म्हणजे काय ?
सर्वसमावेशक शाळा म्हणजे अशा शाळा ज्या शाळांमध्ये सामान्य विद्यार्थ्यांसोबत विशेष गरजा असणाऱ्या बालकांना सोबतच शिक्षण दिले जाते. गेल्या काही वर्षात सर्वसमावेशक शाळांमध्ये वृद्धी घडून आलेली दिसली तरी तरीसुद्धा सर्व सामावेशिकरनाचे उद्दिष्ट अजूनही खूप लांब आहे.
व्याख्या
सर्वसमावेशक शाळेच्या काही व्याख्या पुढीलप्रमाणे
Rauz and Florian :
“सर्वसमावेशक शाळा या विविध प्रकारच्या समस्या सोडवन्याच्या संघटना असून त्याद्वारे सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर भर देण्याचे ध्येय समोर ठेवलेले असते.”
Thomas :
“सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या बरोबरच विशेष गरजा असणाऱ्या किंवा काही विशिष्ट अक्षमता धारण करणाऱ्या
अशा सर्व विद्यार्थ्यांचा स्वीकार करणाऱ्या शाळा म्हणून सर्वसमावेशक शाळांकडे पाहिले जाते.”
शाळांचे प्रकार :
१) विशेष शाळा
२) मुख्य प्रवाहातील शाळा
३) एकात्मिक शाळा
४) सर्वसमावेशक शाळा
विशेष शाळा
काही वेळा विशेष गरजा असणारा बालक विकास हा नियमित स्वरूपाच्या शाळांमधून त्यांच्यामध्ये असणान्या अक्षमतेमुळे होत नाही. अशा वेळेस विद्यार्थ्यांची विशेष गरज लक्षात घेऊन त्यांना काही विशिष्ट मार्गांचा स्वीकार करून देऊन अर्थपूर्ण मार्गाने शिक्षण घ्यावे लागते.
याकरिताच विशेष शाळांची निर्मिती करण्यात आली. या विशेष शाळांमधून विशेष गरजा असणा बालकांना त्यांच्या गरजेनुरूप विकसित होण्यासाठीचे शिक्षण विविध साधनांच्या माध्यमातून दिले जाते.
थोडक्यात सांगायचे झाले तर विशेष शाळा म्हणजे काय तर – विशेष गरजा असणाऱ्या बालकांमधील व्यक्तीभेद लक्षात घेऊन त्या विशेष गरजांची पूर्तता करण्यासाठी त्या बालकाला ज्या विशेष स्वरूपाच्या शाळेमध्ये शिक्षण दिले जाते त्याला विशेष शाळा असे म्हणतात.
विशेष शाळेची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल,
किर्क आणि गॅलॅग्जर
“एकाच वर्गखोलीमधील विद्यार्थी जेव्हा लक्षात येण्याइतपत इतरांपासून भिन्नत्व दर्शवितात तेव्हा शिक्षकांन त्यांच्यातील ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचा सर्वसाधारण नियमित स्वरूपाच्या मार्गाने विकास करणे हे कठीण असते किंवा काही वेळा अशक्य असते.
अशा वेळेस विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्या विद्यार्थ्यांकरिता वेगळ्या शाळांची सोय केली जाते या वेगळ्या पण विशेष गरजांची पूर्तता करणाऱ्या शाळांना विशेष शाळा असे म्हणतात.
यस्सेलडायक आणि अल्गोझिन:
“विशेष शाळा ही अशी एक अनुदेशनात्मक रचना असते की जिची रचना ही विशेष अध्ययन गरजा असणान् विद्यार्थ्यांकरिता केलेली असते.
ज्या विद्याथ्यांना नियमित स्वरूपाच्या वर्गखोल्यांमध्ये काही अध्ययनविषयक बाबीं आकलन होणे कठीण असते त्या विद्याथ्र्यांच्याकरिता शाळेमध्ये विशेष शिक्षणाची गरज असते.
सर्वसाधारण विद्यार्थी जे नियमित स्वरूपाच्या वर्गखोल्यांमध्ये अध्ययन करत असतात ते त्यांचा विकास त्या वर्गखोली मधून करून घे असतात.
पण काही विद्यार्थ्यांना त्यांच्यातील संभाव्य क्षमतांचा पूर्ण वापर करून घेण्यासाठी, कौशल्यांचा पूर्ण विकास करून घेण्यासाठी विशेष शिक्षणाची गरज असते.
विशेष शिक्षणाच्या द्वारे समाज हा विद्यार्थ्यांच्या ज्या वैयक्तिक गरजा आहेत त्यांना प्रतिसाद देतो आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उत्सुक असलेला दिसून येतो. “
शाळांचे प्रकार पुढील प्रमाणे
मुख्य प्रवाहातील शाळा (Type of Schools)
शिक्षणाच्या संदर्भात मुख्य प्रवाह म्हणजे नियमित स्वरूपाच्या वर्गामध्ये काही विशिष्ट वेळेमध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यावर आधारित शिक्षण देणे होय.
असे म्हणता येईल की, नियमित स्वरूपातील वर्गखोल्यांच्या शिक्षणाच्या बरोबरीने विशेष शिक्षणाचे वर्ग चालवले जातील.
मुख्य प्रवाहातील शाळा म्हणजे अशा शाळा की ज्यांच्या विशेष स्वरूपाच्या कोणत्याही शैक्षणिक गरजा नसून त्यांच्या अध्ययन-अध्यापन विषयक गरजांची पूर्तता केली जाते. यांचे स्वरूप नियमित शाळांसारखे असते.
Also Read : Marathi Grammar
मुख्य प्रवाहातील शाळा म्हणजे अशा शाळा की जिथे सर्वसाधारण व कोणत्याही स्वरूपाच्या विशेष गरजा नसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते.
पण याच शाळेत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विकास करण्याकरिता काही विशिष्ट कालावधीकरीता त्या विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये शिक्षणाची परवानगी दिली जाते.
एकात्मिक शाळा (Type of Schools)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने शिक्षणाच्या समान संधींच्या उपलब्धतेसाठी एकात्मिक शाळा या संकल्पनेचा स्वीकार केला.
एकाच शैक्षणिक रचनेमध्ये सर्वसामान्य मुलांच्या बरोबरीने विशेष गरजा असणान्या किंवा अकार्यक्षम ता असणान्या मुलांची आंतरक्रिया प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हा एकात्मिक शाळेमधून केला जातो.
एकात्मिक शिक्षणातून अकार्यक्षम विद्याथ्यांना अशा प्रकारे अध्ययनास प्रेरित केले जाते की ज्यामुळे योग्य शैक्षणिक पर्यावरणात या विद्याथ्र्यांची स्वसंकल्पना वाढीस लागते तसेच स्वतंत्रपणे प्रगती करण्याचा प्रयत्न केला जातो.
थोडक्यात एकात्मिक शाळा म्हणजे अशा स्वरूपाचा शैक्षणिक कार्यक्रम असतो की ज्याच्यामध्ये अपवादात्मक बालके पूर्ण वेळ स्वरूपात किंवा अर्धवेळ स्वरूपात सर्वसाधारण बालकांबरोबर वर्गात शिक्षण घेतात.
काही विशेषीकृत शैक्षणिक मदत आणि सेवा यांची उपलब्धता करून देऊन अपवादात्मक बालकांना शिक्षणाच्या योग्य आणि सर्वसाधारण संघी उपलब्ध करून दिल्या जातात.
सर्वसमावेशक शाळां
सर्वसमावेशक शाळांमध्ये सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या बरोबरीने अपवादात्मक स्थितीतील बालक शिक्षण घेऊ शकते. या विद्यार्थ्यांच्या असणान्या वैविध्यपूर्ण गरजा लक्षात घेऊन योग्य अभ्यासक्रम, सं रचना, अध्यापन व्यूहरचना, संसाधनांचा वापर करून घेतला जातो.
सर्व प्रकारच्या विविध गरजा असणा हे एकाच वेळेस सहजपणे शिक्षण घेऊ शकतात. थोडक्यात सांगायचे तर सर्वसमावेशक शाळा ही एक प्रकारची शैक्षणिक संस्कृती असून यामध्ये विद्यार्थ्यांना अध्ययन-आ संधी निर्माण करून दिली जाते.
यात सर्वसाधारण विद्यार्थी आणि अपवादात्मक बालके ही एकाच वेळेस असल्याने एकमेकांच्या वर्तनाचे व्यवस्थापन आणि समायोजन करत हे विद्यार्थी या शाळांमध्ये विविध अध्ययन करतात.
All Above are Major Type of Schools
संदर्भ : शाळा आणि सर्व समावेशक शाळा (सक्सेस पब्लिकेशन )
1 thought on “शाळांचे प्रकार (Type of Schools)”
Comments are closed.