वाक्प्रचार (vakprachara) व त्यांचे अर्थ | Marathi Grammar

वाक्प्रचार (vakprachara) म्हणजे काय ?

वाक्प्रचार (vakprachara) : मराठी भाषेत असे काही शब्द व शब्द समूह आहेत ज्यांचा शब्दशः अर्थ घेऊन न घेता त्या शब्दाच्या अर्था पेक्षा वेगळाच अर्थ प्राप्त होतो व तोच तो पुढे भाषेत रूढ होतो. अशावेळी शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्द समूहाला “वाक्प्रचार” असे म्हणतात. यालाच  “वाक्संप्रदाय” असेही म्हणतात.

वाक्प्रचार (vakprachara)
वाक्प्रचार (vakprachara) marathi garammar

For Example. उदाहरणासाठी पुढील वाक्य पाहू 

• अंगाची लाही होणे – रागाने बेफाम होणे.

वरील वरील वाक्यात अंगाची लाही होणे याचा अर्थ रागाने बेफाम होणे असा होतो.

पुढे मराठी भाषेतील अजून काही वाक्प्रचार दिले आहेत ते पहा.

 • अकलेचा खंदक – मूर्ख मनुष्य
 • अंग धरणे – लठ्ठ होणे
 • अंग काढून घेणे – सबंध तोडणे / जबाबदारी टाळणे
 • अर्धचंद्र – गचांडी / हाकलपट्टी करणे
 • आकाशाची कुऱ्हाड होणे -सर्व बाजूने संकटे येणे
 • आकाश पाताळ एक करणे – नाहक आरडा ओरडा करणे
 • कोंडमारा होणे – निरुपाय होणे
 • खडे फोडणे – दोष देणे 
 • आकाशाला गवसणी घालने – शक्तीबाहेरची गोष्ट करून पाहणे
 • खसखस पिकणे – मोठ्याने हसणे 
 • खून गाठ बांधणे – निच्छय करणे
 • गळ्यातला ताईत – अतिशय प्रिय वस्तू 
 • गाशा गुंडाळणे – निघून जाणे
 • ग्वाही देणे – साक्ष देणे 
 • घर डोक्यावर घेणे – घरात आरडाओरडा करणे 
 • आभाळ फाटणे – सर्व बाजूने संकटे येणे
 • इतिषश्री करणे – शेवट करणे 
 • उजेड पाडणे – मोठे काम करणे 
 • उखळ पांढरे होणे – पुष्कळ द्रव्य मिळणे 
 • उंटावरचा शहाणा – मूर्खपणाचा सल्ला देणारा 
 • उंबराचे फुल – क्वचित भेटणारी व्यक्ती 
 • एरंडाचे गुऱ्हाळ – कंटाळवाणे भाषण करणे 

Also Read : – मराठी साहित्यिक ( Writer’s in Marathi Language)

 • ओनामा – प्रारंभ 
 • गुण उधळणे – दुर्गुण दाखविणे
 • कळीचा नारद भांडणे – लावणारा 
 • काखा वर करणे – जवळ काही नाही 
 • कानाडोळा करणे – लक्ष न देणे 
 • चतुर्भुज होणे – कैद होणे / लग्न होणे
 • कागदी घोडे नाचविणे – फक्त लेखनात शूरपणा दाखविणे 
 • काक दृष्टीने पाहणे – न्याहाळणे 
 • कानावर पडणे – सहजपणे ऐकू जाणे
 • कान उघडनी करणे – कडक शब्दात चुकीची जाणीव करून देणे
 • घागर गडाचा सुभेदार – पाणक्या
 • चुरमुरे खात बसणे – खजील होणे / पदरी काहीही न पडणे
 • चहा करणे – स्तुती करणे
 • चोरावर मोर बसणे – मात करणे
 • छत्तीसचा आकडा –  विरोध
 • जमदग्नी – अतिशय रागीट मनुष्य
 • जोडे फाटणे – खेटे घालने / नाहक इजा करणे
 • जीव टांगणीला लागणे / चिंताग्रस्त होणे
 • जखमेवर मीठ चोळणे – उनिवेवर प्रहार करणे
 • जिवापाड जपणे – मायेने सांभाळने
 • झाकले माणिक – साधा पण गुणी मनुष्य
 • तळहाताचा फोड – अतिशय काळजीने जपणूक
 • ताटाखालचे मांजर होणे – अंकित होऊन राहणे
 • तारे तोडणे – वेड्यासारखे बोलणे
 • तोंड टाकने – बरळणे
 • तोंडात बोट घालने – नवल करणे
 • तोंडावर येणे – फार जवळ येणे
 • त्राटिका – कजाग बायको
 • त्रेधा उडणे – फजिती होणे 

इयत्ता ५ वी ते ८ वी च्या शिष्यवृत्ती (Scholarship) परीक्षेसाठी हे वाक्प्रचार खूप महत्वाचे (Important) आहेत.

 • तिलांजली देणे – त्याग करणे
 • थंडा फराळ करणे -उपाशी राहणे
 • पांढऱ्या वर काळे करणे – लिहिणे
 • पालथ्या घागरीवर पाणी -निषफळ श्रम
 • थुंकी झेलणे – खुशामतीची सीमा गाठणे
 • पोटाला चिमटा घेणे – अर्धपोटी राहणे
 • पोबारा करणे – पळून जाणे
 • दगडावरची रेघ – खोटे न ठरणारे शब्द
 • फडशा पाडणे – संपविणे
 • दात ओठ खाणे – चरफडणे
 • ब्रम्हांड आठवने – भीती वाटणे
 • दाद देणे – मन व्यक्त करणे / प्रशंसा करणे
 • बोल लावणे – दोष देणे
 • जीव मुठीत धरणे – मन घट्ट करणे
 • बांगडी फुटणे – वैधव्य येणे
 • बिनभाड्याचे घर – तुरुंग
 • दीड शहाणा – मूर्ख
 • बोटे मोडणे – व्यर्थ तडफडणे

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ व त्यांचे वाक्यात उपयोग हे पोलीस भरती, स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप, अशा विविध कामांसाठी उपयुक्त ठरते.

 • शेणसडा होणे – परिस्थिती वाईट होणे / वाया जाणे
 • सद्गदित होणे – गहिवरणे
 • सळो की पळो करणे – त्रास देणे
 • सव्यापसव्य करणे – यातायात करणे
 • सारवासारव करणे – नीटनेटके करणे / संपादणे
 • सूतोवाच करणे – प्रारंभ करणे
 • सूंबाल्या करणे – पळून जाणे –
 • हरताळ फासणे – नाश पावणे/विफल करणे
 • हतबल होणे – असमर्थ ठरणे
 • हळद लावणे – विवाह होणे
 • हस्तक्षेप करणे – ढवळाढवळ करणे
 • पांढऱ्यावर काळे करणे – लिहिणे
 • पालथ्या घागरीवर पाणी – निष्फळ श्रम
 • पोटास चिमटा घेणे – अर्धपोटी राहणे
 • पोबारा करणे – पळून जाणे
 • फडशा पाडणे – संपविणे
 • ब्रह्मांड आठवणे – भीती वाटणे
 • बोल लावणे – दोष देणे
 • बांगडी फुटणे – वैधव्य येणे
 • बिन भाड्याचे घर – तुरुंग
 • बोटे मोडणे – व्यर्थ चरफडणे
 • भागूबाई – भित्रा माणूस
 • मनात मांडे खाणे- मनोराज्य करणे
 • माशा मारणे – निरुद्योगी असणे
 • मुभा असणे – मोकळीक असणे
 • मुलाहिजा बाळगणे – पर्वा करणे
 • मेतकूट जमणे – दृढ मैत्री होणे
 • रसातळाला जाणे नाश होणे
 • राम राम ठोकणे – निरोप देणे
 • राम नसणे – अर्थ नसणे
 • राम म्हणणे – मरणे
 • लंकेची पार्वती – अंगावर दागिने नसलेली स्त्री
 • वर्ज्य करणे – टाळणे
 • वाकडे पाऊल पडणे – दुर्वर्तन करणे
 • वाट लावणे नाश करणे
 • वाखाणणी करणे – स्तुती करणे
 • वाऱ्यावर सोडणे – दुर्लक्ष करणे
 • विडा उचलणे -प्रतिज्ञा करणे
 • षट्कर्णी होणे – गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे
 • शहानिशा करणे – खात्री करणे
 • धूळ चारणे – पूर्ण पराभव करणे
 • धूळभेट – उभ्याउभ्या झालेली भेट

Download Marathi Calligraphy Texts Free

 • धाबे दणाणणे – खूप भीती वाटणे
 • न भूतो न भविष्यति होणे – पूर्वी न झालेली व पुढे न होणारी गोष्ट घडणे
 • नाकी नऊ येणे – बेजार होणे
 • टक लावून पाहणे – बारीक नजरेने पाहणे
 • ठणठण गोपाळ – द्रव्य व विद्या दोन्ही नसलेला
 • डोके खाजविणे – आठवण्याचा प्रयत्न करणे
 • डोळे उघडणे – पश्चात्ताप होणे
 • पड खाणे – माघार घेणे
 • पदरात घालणे – स्वाधीन करणे
 • पाणी पडणे – उत्साहभंग होणे
 • पाणी पाजणे -पराभव करणे
 • पाया घालणे – प्रारंभ करणे –
 • पारा चढणे – खूप रागावणे –
 • पाणउतारा करणे – अपमान करणे
 • पायमल्ली करणे – धुडकावणे
 • पांघरूण घालणे – दोष झाकणे
 • हात ओला करणे – पैसा किंवा भोजन मिळणे
 • हायसे वाटणे – सुटकेचे समाधान होणे
 • हातपाय गाळणे – धीर सोडणे
 • हात टेकणे – निरुपाय होणे
 • हातखंडा असणे – कुशलता असणे
 • हाडाची काडे करणे – खूप श्रमणे
 • हातचा मळ – सहज घडणारी गोष्ट
 • हात धरणे वरचढ ठरणे –
 • हातातोंडाशी गाठ पडणे – जेमतेम खाण्यास मिळणे
 • हातावर तुरी देणे – फसवून जाणे
 • हंबरडा फोडणे – ओक्सीबोक्क्षी रडणे  अनावर शोक होणे

मराठी वाक्प्रचार PDF Download करण्यासाठी पुढील Download बटनावर Click करा