भारतरत्न महर्षी कर्वे

 
महर्षी कर्वे ( महर्षी धोंडो केशव कर्वे ) आधुनिक काळातील साधुपुरुष ज्यांनी त्यांना लाभलेले प्रदीर्घ आयुष्य स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणांसाठी अर्पण केले. त्यांनी समाजसेवेला देव मानले आणि स्त्रीशिक्षणाला त्या देवाची पूजा मानले.
               महाराष्ट्र आणि भारत या थोर महर्षींचा सदैव उपकृत राहील. त्यांनी कायमच स्त्री शिक्षणाला महत्त्व दिले यासाठी त्यांनी महिलांसाठी विद्यापीठ उभारलं आणि हेच त्यांचे अमूल्य असे योगदान आहे.
 
महर्षी-कर्वे-फोटो
(छायाचित्र – pakkapatriot)

महर्षी कर्वे यांचा जन्म व बालपण 

                  महर्षी कर्वे यांचा १८ एप्रिल, १८५८ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात मुरुड जवळ शेरवली या गावात झाला. मुरुडमधील देशभक्त मंड यांच्यामुळे ते प्रेरित झाले होते. त्यांनी त्यांच्याकडून नि:स्वार्थीपणा आणि समाजसेवा हे गुण घेतले. ते १८८४ इ.अ. पास झाले. पुण्यातील फर्गुसन कॉलेजमध्ये १८९१ ते १९१४ सालापर्यंत त्यांनी अध्यापन केले. त्या त्यांनी समाजसेवा करण्याचे ठरवले.
 

 शैक्षणिक क्षेत्रातील योगदान

         महर्षी कर्वे यांचं आयुष्य एखाद्या साधू पुरुषासारखे होते. महिलांच्या हितासाठी त्यांचे शिक्षण हे महत्वाच आहे. हे त्यांनी संपूर्ण देशाला पटवून दिलं. महिलांना माणूस म्हणून मानाने जगता यावं हीच त्यांची इच्छा होती.

स्त्री शिक्षणाविषयी जागरुकता आणि प्रसार
भारतात त्या काळात महिलांबद्दल अनेक चुकीच्या कल्पना होत्या. महिलांचे जग फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित आहे असा गैरसमज समाजात होता. बालविवाह, विधवांचा छळ, अर्थहीन चालीरीती यात बदल घडवून आणायचा असेल तर महिला शिक्षण गरजेचे आहे हे त्यांनी पटवून दिले.
 
          ग्रामीण भागातील महिलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी अथक परिश्रम घेतले. शिक्षित स्त्री या वाईट आणि चुकीच्या चालीरीतीविरुद्ध आवाज उठवू लागली. याचे सारे श्रेय महर्षींना जाते.
 
 
महिला विद्यापीठाची स्थापना

२० जून १९९६ रोजी त्यांनी महिलांच्या उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे महिला विद्यापीठाची स्थापना केली. त्यांनी महिलांच्या मानसिक आणि शारीरिक गरजा ध्यानात घेऊन त्यांच्यासाठी अभ्यासक्रम आखला. S.N.D.T. University हे महर्षीचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाचे योगदान आहे.

ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार
महर्षीींनी ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण संस्था स्थापन केली. त्यांनी या महिलांच्या शैक्षणिक संस्थांसाठी देणग्या घेतल्या. या सगळ्या परिश्रमानंतर ग्रामीण भागात महिला शिक्षण सुरू झाले.

 मृत्यू

९ नोव्हेंबर १९६२ रोजी पुण्यातील आश्रमात मृत्यू झाला. त्यावेळी त्याचं वय १०४  वर्ष होते.

वसंत कानेटकर यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनावर  लिहिलेले ‘हिमालयाची सावली’ नावाचे नाटक प्रसिद्ध आहे.

1 thought on “भारतरत्न महर्षी कर्वे”

Comments are closed.