ध्वनी प्रदुषण म्हणजे काय ? | What is Noise Pollution? (in marathi)

 

 

 

ध्वनी प्रदुषण

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक वस्तूचा एक विशिष्ट आवाज असतो असा एकण्यास सुसह्य असणाऱ्या आवाजाला आपण ” ध्वनी ” (Sound) असे म्हणतो. यातील काही ध्वनी ऐकण्यास सुसह्य असतात तर तर काही ध्वनि कानांना असह्य असतात. अशा असह्य ध्वनिला गोंगाट  (Noise) असे म्हणतात. ध्वनी मोजण्याचे एकक डेसिबल (dB) हे आहे. (noise pollution measured in dB – Decible) जागतिक आरोग्य संघटनेने अवजाच्या तीव्रतेचे माप ठरवून दिलेले आहे. दिवसा या आवाजाची तीव्रता 45 डेसिबल तर रात्री 35 डेसिबल इतकी ठरवून दिलेली आहे.

 

ध्वनी प्रदुषण म्हणजे काय ?    what is Noise Pollution?

 जेव्हा आवाजाची तीव्रता सुसह्य नसते व त्यामुळे येकणाऱ्याला त्याचा त्रास होतो अशा वेळी त्या आवाजाला गोंगाट असे म्हणतात. अशा जास्त तीव्रतेच्या आवाजामुळे माणसामध्ये चिडचिडेपणा, नैराश्याची भावना तयार होते त्याला ध्वनिप्रदूषण (Noise Pollution) असे म्हणतात.


ध्वनी प्रदूषणाची कारणे ? (Reasons of Noise Pollution )

ध्वनिप्रदूषणाची कारणे त्या – त्या परिसरावर अवलंबून असतात.
1. वाहनांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण (Noise pollution because of Vehicles); शहरांमध्ये अहोरात्र वाहनांची वर्दळ सुरू असते त्याच्या इंजिनाचे आवाज, गाडीचे हॉर्न,  इ. आवाज यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदुषण होते. विमानतळ (airport) आणि रेल्वे स्टेशन (railway station) अशा जास्त गर्दीच्या ठिकाणी विमाने व रेल्वेच्या इंजिनांचा कर्कश आवाज यामुळे ध्वनिप्रदूषण होते.

2. लग्नसोहळे, सभा, जाहिराती, अशा ठिकाणी मोठ्या संख्येने लाऊडस्पिकर लावलेले असतात. लग्ना मध्ये मोठ्या आवाजात dj वर गाणी चालू असतात. त्यांचा आवाज 45 डेसिबल पेक्षा जास्त असतो. या सर्वांमुळे ध्वनिप्रदूषण होते.

3. बाजारांमध्ये गर्दीच्या ठिकाणी एकाच वेळी अनेक व्यक्ती मोठ मोठ्या आवाजात बोलत असतात.विक्रेते मोठ्याने ओरडत असतात त्यामुळे अशा सार्वजनिक ठिकाणी गोंगाट (Babel) होतो व ध्वनी प्रदुषण होत असते.

4. घरांमध्ये सुद्धा टीव्ही सेट मोठ्या आवाजात चालू असतात, घरात फिरणारे  पंखे, साऊंड सिस्टीम वर चालू असणारे मोठ्या आवाजातील संगीत यामुळे सुध्दा ध्वनिप्रदूषण होते.

5. भारतामध्ये दिवाळी हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो मिठाईबरोबरच फटाके फोडले जातात पण या दिवाळीच्या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषण होतो. तरीही आता भारत सरकारने 125 डेसिबल पेक्षा अधिक तीव्रतेच्या फटाक्यांची निर्मिती व विक्री करण्यास बंदी घातली आहे.


ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम : (Side Effects of Noise Pollution)


 ध्वनिप्रदूषणाचे मानसिक व शारीरिक असे दोन्ही प्रकारचे दुष्परिणाम मानवी शरीरावर बघायला मिळतात. (noise pollution is harmful to human)

Questions related Noise pollurion 

  • explain in what way noise pollution is harmful to humans.
  • effect of noise pollution on human body.
  • what possible health effects of noise pollution include.
  • noise pollution causes.
  • noise pollution essay in marathi 

noise-pollution-drawings

  मानसिक दुष्परिणाम  (Psychological Damage) :

ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक शांती ढासळते मनुष्य चिडका बनतो सतत चिडचिड करतो. त्याचबरोबर निद्रानाश (Insomnia) हा मोठा दुष्परिणाम बघायला मिळतो. झोप लागत नाही व अपुऱ्या झोपेमुळे माणूस आक्रमक बनतो.

 
 
 

 शारीरिक दुष्परिणाम  (Physical Damage) :

सततच्या उच्च तीव्रतेच्या आवाजामुळे माणसांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. उच्च रक्तदाबामुळे हृदय रोग  होण्याची शक्यताही वाढत जाते. तर ज्यांना हृदय रोगाचा त्रास आहे अशा माणसांना जास्त तीव्रतेच्या आवाजाने मृत्यू ओढवण्याची शक्यताही जास्त असते.
गर्भवती स्त्रीच्या गर्भालाही उच्च आवाजामुळे धोका निर्माण होतो. 
कानावर जास्त तीव्रतेचा आवाज सतत पडल्यामुळे अशा व्यक्तीला म्हातारपणी कायमचा बहिरेपणा येतो. कानांचे आजार निर्माण होतात, सतत राहणारी डोकेदुखी माणसामध्ये पाहायला मिळते.

                         माणसांप्रमाणेच जनावरांनाही ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो. मोठ मोठ्या पाणबुड्यामध्ये (Submerines)  वापरल्या जाणाऱ्या सोनार (Sonar) मशिनिमुळे मोठ्या प्रमाणावर व्हेल माशांच्या मृत्यू होतो. विमानतळाच्या आसपास असणाऱ्या घरांच्या भिंतीना उच्च डेसिबल च्या आवाजामुळे तडे पडतात.

ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी करायच्या उपाय योजना :  (how we can reduce noise pollution)


1.ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. दवाखाण्यासमोर (Hospitals) नो हॉर्न (No Horn) असे फलक लावलेले दिसतात. 

2. जागतिक आरोग्य संघटनेने दिवसा आवाजाच्या तीव्रतेची पातळी 45 dB व रात्री 35 dB ची लिमिट ठरवून दिली आहे. भारतामध्ये ही लिमिट दिवसा 50 dB व रात्री 40dB ठरलेली आहे.

3. मुंबई मध्ये उड्डाणपुलाच्या (Fly Over) च्या दोन्ही बाजूने 7 फूट उंचीची ध्वनिरोधक भिंत बांधली ज्यामुळे ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत मिळते.

4. लग्नसमारंभ, गणेशोत्सव, नवरात्री व इतर समारंभ या ठिकाणी रात्री 10 वाजेनंतर मोठ्या आवाजात गणे वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत पार्ट्या व dj वर गाणे वाजविण्यास बंदी घातली आहे.

5. वाहनांची वेळच्या वेळी योग्य निगा राखणे ज्यामुळे इंजीनांचा आवाज कमी होईल. रस्त्यांची सुधारणा व वाहतुकीच्या नियमांचे पालन यामुळे ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

6. विमान तळावर विमानाच्या उड्डाणाच्या वेळी व उतरण्याच्या वेळी होणारा ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी ध्वनिरोधकांची (Soundproofing)  निर्मिती करणे.

7. झाडांमुळे ही ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत होते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण (Plantation)  करावे. 
 
 
read more articles about pollution :