नमस्कार मित्रांनो ज्ञान आणि अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमापलीकडील भाषा या विषयावर अधिक माहिती मिळवू.
थोडक्यात
ज्ञान हे मानवी जीवन व सामाजिक विकासाचे साधन आहे असे आपण मानतो. मानव ज्ञानाच्या सहाय्याने सहाय्याने
आपला आर्थिक सामाजिक व बौद्धिक विकास घडवितो . ज्ञान म्हणजे महिती माहितीचे संहितीकरण अत्म्सातीकरण होय. ज्ञानाच्या सहायाने समाजात आपण विचारांची देवाण घेवाण करत असतो.
ज्ञानाची प्राप्ती व ज्ञानाची निर्मिती ही ज्ञानाच्या स्त्रोतांद्वारे होते. त्यानुसार ज्ञानाचे विविध प्रकार होतात. ज्ञान ग्रहण करत असताना व्यक्तीला विविध कौशल्यांचा उपयोग करावा लागतो.
त्यातून ज्ञान व कौशल्य यांचा सहसंबंध प्रस्थापित होतो. आजच्या काळात दैनंदिन अध्यापनामध्ये विविध पद्धतींचा व अध्यापन तंत्रांचा वापर केला जातो.
मूलत: बालक केंद्रित शिक्षण प्रणाली असल्याने कृतीद्वारे अध्ययन चर्चांच्याद्वारे अध्ययन तसेच शोधनाच्याद्वारे अध्ययन या कृती प्रधान तसेच विद्यार्थी प्रधान पद्धतींचा वापर करतात.
आधुनिक शिक्षणाचा आधुनिक समाजाशी संदर्भ जोडता असे दिसून येते की, आजचा समाज हा माहिती अधिष्ठित असण्यापेक्षा ही ज्ञानाधिष्ठित असणे गरजेचे आहे.
ज्ञानाधिष्ठित समाज हा माहितीधिष्ठित समाजापेक्षा स्वतःचे वेगळेपण हे नक्कीच दर्शवितो. ज्ञानाच्या आधारे माणसाला वस्तूस्थिती माहिती, कौशल्ये यांच्या बाबतीत जागरूकता निर्माण होते.
कोणत्याही विषयासंबंधीचे सैद्धांतिक किंवा प्रात्यक्षिक स्वरूपाचे आकलन करून घेणे म्हणजे ज्ञान होय.
ज्ञान
ज्ञान हे सर्वच ज्ञानशाखांचा गाभा असल्याने ज्ञानाचे तत्त्वज्ञान, नीती स्वतंत्रपणे मांडणे आवश्यक आहे. काही शिक्षणतज्ज्ञांच्या मते, ज्ञान ही एक क्रिया असून वस्तूवर मनाची क्रिया होऊन त्या वस्तूचे स्वरूप समजणे म्हणजे ज्ञान.
पण ज्ञान हे कर्म होऊ शकते काय ? हा एक मूलभूत प्रश्न आहे. उपनिषदे व अन्य तत्त्वज्ञ यांच्या मते, ज्ञान हे जाणीवरूप, अनुभवरूप असते व जे अज्ञान आहे ते जाणल्याने ज्ञान होते असे म्हणतात.
ज्ञान अथवा Knowledge हा शब्द माहीत असणे, अनुभवावरून अथवा शिक्षणातून माहिती करून घेणे, जाणणे, व्यक्तिगत अनुभूतीतून एखाद्या तत्त्वाची प्राप्ती होणे वगैरे मानले जाते.
म्हणजेच, ज्ञान म्हणजे माहिती, माहितीचे संहितीकरण, आत्मसात करणे,स्वानुभूति आणि तिचे प्रकटीकरण अशी ज्ञानाची सर्वसाधारण व्याख्या करता येईल.
अर्थ :
सर्वसाधारणपणे ज्ञान हे शिक्षांप्रनालीद्वारे प्राप्त होते जीवनातील शैक्षणिक अनुभवांद्वारे ज्ञान पार पडते. यामध्ये माहिती वर्णन, कौशले, तत्थे, संधोधन आणि अनुभव या घटकांचा समावेश असतो.
ज्ञान हे विविध विशायासंदर्भात सिधान्तिक व अनुभवाद्वारे ज्ञान आत्मसात करणे होय.
ज्ञान आणि अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमापलीकडील भाषा
व्याख्या
विविध विचार वान्तांच्या अनुसार ज्ञानाच्या काही व्याख्या पुढीलप्रमाणे,
१. डॉ. बाऊएर, झेरोक्स पार्क
ज्ञान हे कृतीशील माहिती समजून घेण्यासंदर्भातील व निर्मिती संदर्भातील साधन आहे.
२. कार्ल – एरिक – स्वेनी
ज्ञान हे माहिती असणे, जागरूकता, माहिती, बुद्धिमत्ता, सुज्ञान, विज्ञान, अनुभव, कौशल्य, अंतर्दृष्टी, क्षमता कसे ज्ञान प्राप्त करणे, प्रात्यक्षित क्षमता, व्यवहारिक ज्ञान, अध्ययन, बुद्धिमत्ता, निश्चितता या संकल्पनांद्वारे व क्रियांद्वारे समजून घेता येते
३. कास्टेल
ज्ञान हे एक तथ्य आणि कल्पनांचे संघटित स्पष्टीकरण आहे; जे पद्धतशीरपणे व्यवहार्यतेच्या आणि संप्रेषणाच्या माध्यमातून निरीक्षण आणि प्रात्यक्षिक परिणाम किंवा निष्पत्तींच्या स्वरूपात प्रस्तुत होते.
ज्ञान आणि अभ्यासक्रम याचे प्रकार :
ज्ञान हे विविध प्रकारचे असते त्याचे पुढीलप्रमाणे काही प्रकार पडतात.
१. भौतिक ज्ञान
भौतिक ज्ञान म्हणजे काय तर विद्यार्थ्यांना भौतिक ज्ञान हे विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे होते. या ज्ञानाद्वारे परिसरातील, देशातील आजूबाजूच्या भौतिक जगातील अद्यायवत ज्ञानाची प्राप्ती होते. हे ज्ञान गणितीय व तार्किक स्वरूपाच्या विचारांवर अवलंबून असते.
२. सामाजिक ज्ञान
अध्ययन प्रणाली मध्ये सामाजिक ज्ञानानाचाही समावेश ह्तोतो. आपण समाजात वावरत असताना ज्ञानाची आपल्या विचारांची देवाण घेवाण होते. त्यामुळे ज्ञान प्रसारित होऊन व्यक्तीच्या सामाजिक ज्ञानात भर पडते.
३. संकल्पनात्मक ज्ञान
एखादी माहिती ही ज्यावेळेस संकल्पनांवर आधारित असते त्यावेळेस त्या संकल्पनात्मक माहितीचे विभिन्न भागात वर्गीकरण केले जाते, या प्रकारच्या ज्ञानास संकल्पनात्मक ज्ञान असे म्हणतात.
संकल्पनात्मक ज्ञान विषयासंदर्भातील माहितीचे संकलन करून त्यातील घटकांमध्ये सहसंबंध दर्शवते. संकल्पनात्मक ज्ञान हे विषयासंदर्भातील संकल्पनात्मक माहितीवर प्रकाश टाकते.
संकल्पनात्मक ज्ञान हे फक्त परिणामकारक आणि हेतुपूर्ण अध्ययन करण्याच्या उद्देशाने उपयोगात आणले जाते.
४. प्रक्रियात्मक ज्ञान :
प्रक्रियात्मक ज्ञानामध्ये महितीच्या प्राप्तीसाठी काही निर्देशित कार्य आणि क्रिया यांचा सहभाग आवश्यक असतो. शिक्षणामध्ये गट किंवा समूहांद्वारे अध्यापन केल्याने प्रक्रियात्मक ज्ञानात भर पडते.
Also Read : B. Edu Question Papers