कासव (Turtle / Tortoise)
कासव हे पाणी आणि जमिनीवर दोन्ही जागी जिवंत राहणारा उभयचर जीव आहे. कासवाचे त्याच्या राहण्यावरून 3 प्रकार पडतात.
१) जमिनीवर राहणारे कासव ( Tortoise )
२) नदी किंवा विहिरीमध्ये राहणारे कासव (sweet water turtle )
३) समुद्रात राहणारे कासव (sea turtle)
कासव हा प्राणी दीर्घकाळ जिवंत राहणारा उभयचर प्राणी आहे. कासव सुमारे १५० वर्षापर्यंत जिवंत राहू शकतात. भारतामध्ये धार्मिक दृष्ट्या कासवाला खूप महत्वाचे स्थान दिले गेले आहे. भारतातील मंदिरांमध्ये मंदिराच्या प्रवेशद्वारात कासवाच्या मूर्ती बघयला मिळतात. अख्यायीकांनुसार कूर्म अवतार हा विष्णूचा दुसरा अवतार समाजाला जातो.
कासावना ४ पाय असतात. व पायांना मोठी आणि टोकदार नखे असतात. जमिनीवर राहणारे कासव या पायांचा वापर चालण्यासाठी व नखांचा वापर अन्न शोधण्यासाठी करतात. पाण्यात राहणाऱ्या कासावांमध्ये पायांच्या बोटांमध्ये पातळ पडता असतो , त्याचा वापर ते वल्ह्या प्रमाणे पाण्यात पोहण्यासाठी करतात. कासव हा सर्वभक्षक प्राणी आहे. तो पाण्य्यात राहत असताना शेवाळ, पानगवत,गोगलगाई, लहान शिंपले, जेली फिश, झिंगे खून जगतो. कासवाना दात नसतात त्या ऐवजी त्यांचे तोंड चोचीप्रमाणे आतल्या बाजूला वळलेले असते त्याचा वापर करून ते अन्न खातात.
कासव आपले संरक्षण करण्यासाठी स्वताचे डोके, पाय, आणि शेपूट त्याच्या कठीण कवचाखाली ओढून घेते व स्वताचे रक्षण करते. भारतामध्ये धार्मिक महत्व लाभल्याने आपोआपच कासवाचे संवर्धन होते. पण काही दुर्मिळ प्रजातींना धोका निर्माण झाला आहे.
# उभयचर प्राणी | जलचर | कासव | Tortoise
1 thought on “कासव व त्यांचे प्रकार | Types Of Totoise / Turtle”
Comments are closed.