एकवचन – अनेकवचन

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेखात आपण मराठी व्याकरणातील एकवचन आणि अनेकवचन( Singular and Plural Words ) शब्दांच्या जोड्या अभ्यासणार आहोत.

पुल्लिंगी नामांची अनेकवचने

For Example : पुढील नामांची रूपे पाहा :

एकवचन व अनेकवचन

  • कुत्रा – कुत्रे
  • आंबा – आंबे
  • घोडा – घोडे
  • ससा – ससे
  • रस्ता – रस्ते
  • लांडगा – लांडगे
  • मुलगा – मुलगे
  • फळा – फळे
  • राजा – राजे

यावरून असे म्हणता येईल, की अकारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एकारान्त होते.

as follows पुढील नामांची रूपे पाहा :

  • देव – देव
  • शत्रू – शत्रू
  • तेली – तेली
  • उंदीर – उंदीर
  • लाडू – लाडू
  • गहू – गहू
  • कवी – कवी
  • फोटो – फोटो

नियम – आकारान्ताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामांची रूपे दोन्ही वचनांत सारखीच असतात.

पुल्लिंगी नामांमध्ये आकारान्त नामांचे अनेकवचन वेगळे असते. मराठी ए, ऐ व औ अन्तांची पुल्लिंगी नामे नाहीत.

स्त्रीलिंगी नामांची अनेकवचने

पुढील नामांची अनेकवचने पाहा :

  • वेळ – वेळा
  • केळ – केळी
  • विहीर – विहिरी
  • वीट – विटा
  • भिंत – भिंती
  • म्हैस – म्हशी
  • चूक – चुका
  • तारीख – तारखा
  • सून – सुना

नियम अकारान्त स्त्रीलिंगी नामाचे एकवचन केव्हा आ-कारान्त होते तर केव्हा ई-कारान्त होते. ‘य’ नंतर ई आल्यास उच्चारात य चा लोप होतो.

in the same way उदा. गाय- गायी-गाई, सोय-सोयी-सोई

पुढील नामांची अनेकवचनांची रूपे पाहा :

  • भाषा – भाषा
  • पूजा – पूजा
  • दिशा – दिशा
  • आज्ञा – आज्ञा
  • सभा – सभा
  • विद्या – विद्या

आ-कारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेकवचन एकवचनासारखेच राहते.

एकवचन -अनेकवचन | Singular and Plural
एकवचन -अनेकवचन

उदा.

  • नदी – नद्या
  • बी – बिया
  • स्त्री – स्त्रिया
  • काठी – काठ्या
  • भाकरी – भाकऱ्या
  • लेखणी – लेखण्या
  • टाकी – टाक्या
  • गाडी – गाड्या
  • उडी – उड्या

Similarly पुढील शब्दांची रूपे पाहा :

  • सासू – सासवा
  • पिसू – पिसवा
  • जाऊ – जावा
  • जाऊ – जावा
  • जळू – जळवा
  • ऊ – ऊवा

नियम – उ-ऊ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वा-कारान्त होते. (अपवाद – वाळू, बस्तू, बाजू)

(६) ओ-कारान्त स्त्रीलिंगी शब्द – प्रचारात असलेला

बायको असून त्याचे अनेकवचन बायका असे होते.

नपुंसकलिंगी नामांचे अनेकवचन

पुढील शब्दांची रूपे पाहा :

  • घर – घरे
  • फूल – फुले
  • माणूस – माणसे
  • दार – दारे
  • शेत – शेते
  • घड्याळ – घड्याळे

नियम – अ-कारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन ए-कारान्त होते.

पुढील शब्दांची रूपे पाहा :

For Example :

मोती – मोत्ये

मिरी – मिरे

नियम – ई-कारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन ए-कारान्त होते व विकल्पाने ‘य’ हा आदेश होतो. (अपवाद – पाणी, लोणी, दही, अस्थी)

Download Images pnglab.in
Download free PNG IMages

(३) पुढील शब्दांची रूपे पाहा :

  • पाखरू – पाखरे
  • वासरू – वासरे
  • लिंबू – लिंबे
  • गळू – गळवे
  • पिलू – पिले

उ-ऊ-कारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन ए-कारान्त होते. क्वचित प्रसंगी ते वे-कारान्त होते.

आसू – आसवे

Also Read :

राजा राम मोहन रोय