अलंकार | Alankar in Marathi

अलंकार | Alankar | Figure of Speech म्हणजे काय ?

आपले म्हणणे प्रभावीपणे मांडण्यासाठी इतरांना अधिक प्रभावीपणे समजण्यासाठी अलंकाराची गरज भासते.अलंकारामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते.

अलंकाराची व्याख्या

“अलंकार” या शब्दाचा अर्थ ‘दागिना’ असा होतो. दागिने घातल्याने जशी माणसाच्या शरीराला शोभा येते, त्यांच्या सौंदर्यात भर पडते. अलंकारामुळे शरीराला शोभा येते. तशीच अलंकारामुळे भाषेलाही शोभा येते.

भाषेला ज्या – ज्या गुणधर्मामुळे शोभा येते त्या गुणधार्मांना ‘भाषेचेअलंकार’ असे म्हणतात.

अलंकाराचे प्रमुख २ प्रकार कोणते ?

अलंकाराचे प्रमुख २ प्रकार पडतात.

  • शब्दालंकार
  • अर्थालंकार

शब्दालंकार | Shadalankar

एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा अधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते.

भाषेचे अलंकार | Bhasheche alankar
भाषेचे अलंकार

अलंकारामध्ये शब्दालांकाराचे तीन उपप्रकार पडतात.

  • अनुप्रास अलंकार
  • यमक अलंकार
  • श्लेष अलंकार

अनुप्रास अलंकार | Anupras Alankar

एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे “नादमाधुर्य” ‘होऊन जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते ,तेव्हा ‘अनुप्रास’ हा अलंकार होतो.

For Example –

गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले,
शितलतनु चपलचरण अनिलगन निघाले.
रजतनील , ताम्रनिल
स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटी नावाचा कृष्ण मेळ खेळे.

वरील काव्य पंक्तीमध्ये ‘ल’ या अक्षराची पुन्हा पुन्हा (Again and Again) पुनरावृत्ती झालेली आहे, त्यामुळे जो नाद निर्माण होतो यामुळे कवितेच्या ओळींना शोभा आली आहे.

Another Examples :

  1. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी | गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे संतांची वाणी ||

यमक अलंकार | Rhymes

अनुप्रास अलंकारा प्रमाणे यमक अलंकारात सुद्धा अक्षरांची पुनरावृत्ती असते पण यामध्ये हि पुनरावृत्ती कवितेतील ओळींच्या शेवटी मध्ये किंवा एका ठराविक ठिकाणी वेग-वेगळ्या अर्थाने येतात तेव्हा ‘यमक’ अलंकार होतो.

e.g. – सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो |

कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

वरील कवितेच्या ओळींमध्ये शेवटी “डो” हे अक्षर क्रमाने आले आहे त्यामुळे ऐकताना गम्मत वाटते, आता अशाच अर्थाची काही अजून उदाहरणे पाहू.

१) जाणावा तो ज्ञानी | पूर्ण समाधानी | नि:संदेह मनी | सर्वकाळ ||

वरील ओळीतील पहिल्या ३ चरणांच्या शेवटी ‘नी‘ ची पुनरावृत्ती झाली आहे.

२) राज्य गादीवरी | कधी तुझ्या आठवणी, फळा आली माय | मायेची पाठवणी.

3) आला वसंत कविकोकिल हाही आला | आलापितो सुचवितो अरुणोदयाला |

श्लेष अलंकार | Shlesh Alankar

एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा “श्लेष” हा अलंकार होतो.

अधिक अभ्यासासाठी पुढील काही उदाहरणे पाहू.

१) हनुमंतराव – काय महिपतराव, तुम्हाला सुपारी लागते का ?

महिपतराव : हो, हो लागते ना !

हनुमंतराव : जर लागते, तर का खाता ?

वरील संवादात लागते हा शब्द दोन अर्थांनी आला आहे १) हवी असणे २) खाल्ल्याने भोवळ किंवा चक्कर येणे. श्लेष म्हणजे आलिंगन किंवा मिठी एकाचा शब्दाला दोन अर्थाची मिठी बसलेली असते त्यामुळे एकाच शब्दाचे दोन अर्थ निघतात.

for Instance : 1) मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही ?

२) हे मेघा तु सर्वांना जीवन देतोस.

३) ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले | औषध नलगे मजला, परिसुनी माता ‘बरे’ म्हणुनी डोळे ||

४) श्रीकृष्ण नवरा मी नवरी । शिशुपाल नवरा मी न-वरी

५) कुस्करु नका ही सुमने । जरी वास नसे तिळ यांस, तरी तुम्हांस अर्पिली सु-मने ।।

अर्थालंकार | Arthalankar

अनेक शब्दांच्या अर्थामुळे काव्यात किंवा गाद्यात सौंदर्य निर्माण होते, आपल्याला जे सांगावयाचे आहे ते प्रभावी रीतीने सांगण्यासाठी त्यासाख्याच दुराऱ्या गोष्टींची आपण मदत घेतो. त्यासाठी आपण खालील Example पाहू.

For Example : निलेशचे अक्षर चांगले आहे हे सांगण्यासाठी आपण अक्षराची तुलना मोत्याशी करतो similarly आपण म्हणू निलेशचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे.

येथे अक्षरमोती यातील साम्य आपल्याला दिसून येते

अजून काही Example पाहू

१) शाळा मातेप्रमाणे आहे.

२) आमच्या गावातील सरपंच हे कर्णासारखे दानशूर आहेत.

३) आमच्या शाळेतील गणेश प्रा. शिवाजीराव भोसले यांच्यासारखा चांगला वक्ता आहे.

अर्थालंकाराचे उपप्रकार किती ? व कोणते ?

  • उपमेय अलंकार
  • उपमान
  • साधारणधर्म
  • साम्यावाचक शब्द
  • उपमा
  • उत्प्रेक्षा
  • रूपक
  • व्यतिरेक
  • अनन्वय
  • अतिशयोक्ती
  • दृष्टांत
  • स्वभावोक्ती
भाषेचे अलंकार | उपमा, उपमेय, उत्प्रेक्षा
भाषेचे अलंकार | उपमा, उपमेय, उत्प्रेक्षा

similarly आता अर्थालंकाराचा आभास करू

उपमेय | Upamey

ज्याची तुलना करावयची आहे किंवा ज्याचे वर्णन करवयाचे आहे तो घटक म्हणजे ‘उपमेय‘ होय.

उपमान | Upman

ज्याच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजे उपमान होय.

साधारण धर्म

दोन वस्तुत असणारा सारखेपणा किंवा दोन वस्तुत असणारा समान गुणधर्म.

साम्यवाचक शब्द | Samyavachak Shabd

दोन वस्तुत असणारा सारखेपणा सारखेपण दाखविण्यासाठी वापरला जाणारा शब्द.

उपमा | Upama

सावळाच राग तुझा पावसाळी नभापरी !

वरील ओळीत दोन वस्तूंचे साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले दिसते, असे जेथे असते तेथे “उपमा” ह अलंकार असतो.

For Example :

  • आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे !
  • मुंबईची ‘घरे’ मात्र लहान ! कबुतरांच्या खुराड्यांसारखी !

उत्प्रेक्षा अलंकार | Utpreksha Alankar

उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना . ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक (उपमेय) हि जणू काही दुसरी वस्तू (उपमानच) आहे अशी कल्पना करणे याला उत्प्रेक्षा असे म्हणतात.

Likewise अजून उदाहरणे बघू.

पुढील वाक्ये वाचा :

१) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.

२) अत्रीच्या आश्रर्मी । नेलें मज वाटें। माहेरची वाटें। खरेखुरें।

३) किती माझा कोंबडा मजेदार । मान त्याची कितीतरी बाकदार । शिरोभागी तांबडा तुरा हाले । जणू जास्वंदी फूल उमललेले ।। अर्धपायी पांढरीशी विजार। गमे विहगांतिल बडा फौजदार।।

कोंबड्याचा तुरा हे कवीला जणू उमललेले जास्वंदीचे फूल वाटले किंवा पाढऱ्या अर्ध्या विजारीमुळे तो पक्ष्यांतला बडा फौजदार भासला, ही कल्पना म्हणजेच उत्प्रेक्षा होय.

उत्प्रेक्षा अलंकारात ‘जणू, जणूकाय, गमे, वाटे, भासे, की’ यासारखे साम्यवाचक शब्द येतात.

रूपक अलंकार | Rupak

उपमेय व उपमान यांत एकरूपता आहे. ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असते तेथे रूपक हा अलंकार असतो.

In Addition (अधिक माहितीसाठी रूपक अलंकाराची उदाहरणे पाहू )

१) बाई काय सांगो । स्वामीची ती दृष्टी । अमृताची वृष्टी । मज होय ।।

२) लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा तशी मूर्ती घडते.

३) ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाहे रमा । दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ।।

Download Images pnglab.in
Download free PNG IMages

वरील उदाहरणात स्वामीची दृष्टी व अमृताची वृष्टी ही दोन्ही एकरूपच मानली आहेत.

दुसऱ्या वाक्यात लहान मूल हे मातीच्या गोळ्यासारखे आहे असे नुसते उपमेय व उपमान यांतील केवळ सादृश्य न दाखविता त्यांच्यातील अभेद वर्णिलेला आहे.

दुसऱ्या वाक्यातील उपमेय (मुख) व उपमान (चंद्र) ही एकरूप मानून ‘मुखचंद्रमा’ असा शब्दप्रयोग केला आहे.

अशा प्रकारे उपमेय व उपमान यांत एकरूपता आहे.

Also read : मराठी भाषेतील समूह दर्शक शब्द | Marathi Bhashetil Samuhdarshak Shabd