कलियुगातील कर्ण – पालम कल्याणसुंदरम

जगातील सर्वात मोठी दानशूर व्यक्ती –  पालम कल्याणसुंदरम !

 

                         १९६३ च्या भारत चीन युद्धाच्या वेळी त्यावेळचे पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आकाशवाणी वरून देशाला सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन जनतेला केले त्यावेळी कोणताही विचार न करता एक मुलगा सरळ तमिळनाडूचे मुख्यमंत्री कामराजन यांना जाऊन भेटला या देशाला मदत म्हणून आपल्या गळ्यातील ६५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी देऊ केली. कोण होता हा मुलगा ? ते होते पालम कल्याण सुंदरम !


       कोणत्याही श्रीमंताच्या श्रीमंतीला लाजवेल असे व्यक्तिमत्व १० ऑगस्ट १९४० साली तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यात नानगुनारी तालुक्यातील मेरकुरूवेलांगुळंम येथे एका गरीब कुटुंबात जन्माला आले. मुळात गावात प्राथमिक सोयी सुविधांची एवढी कमतरता होती की धड वीज नाही, प्राथमिक शाळा नाही की प्राथमिक आरोग्य सोयी सुविधाही त्यांच्या गावी नव्हत्या त्यावर कळस म्हणजे लहानपणापासूनच त्यांचा आवाज हा अतिशय मृदू स्त्रियांसरखा त्यामुळे त्यांना खूप दुःख होत असे अनेक वेळा मनात स्वतःला संपवण्याचे विचारही त्यांच्या मनात येत. त्यांना वाचनाची आवड होती त्यांना तमिलवानन याचे कलकांडू हे मासिक वाचल्यानंतर त्यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार सुरू केला त्यांच्याजवळ त्यांनी आपले दुःख बोलून दाखवल्या नंतर तमिल्वानान त्यांना म्हणाले की, 

तू असे कार्य कर की ते फक्त तुझ्या कार्यासाठी तुला ओळखतील त्यांना तुझ्या चांगल्या कामाविषयी बोलण्यास भाग पाड! 

 त्यांच्या या वाक्याने ते एवढे प्रभावित झाले की कल्याण सुंदरम यांनी समाजातील गरजू घटकांना मदत करण्याचा निर्णय घेतला.

     कल्याण सुंदरम यांनी त्यांचे M.A. चे शिक्षण पूर्ण करून लायब्ररी सायन्स या विषयात गोल्ड मेडल मिळविले पुढे लायब्रेरियनचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लायब्रेरियन म्हणून नोकरी करण्यास सुरूवात केली नोकरीच्या पहिल्या पागरापासूनच त्यांनी त्यांना मिळणारा संपूर्ण पगार हा परस्पर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करत. आपल्या लायब्रेरियनच्या ३५ वर्षाच्या नोकरीत त्यांनी एकदाही त्यांचा पगार स्वतःसाठी खर्च केला नाही एवढेच नाही तर १९९८ मध्ये जेव्हा ते सेवानिवृत्त झाले तेव्हा त्यांना मिळालेली सेवानिवृत्तीची १० लाखाची रक्कम त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी दान केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर सेवानिवृत्त झाल्यानंतर ते हॉटेल मध्ये वेटर चे काम करून मिळणाऱ्या पैशाचा वापर ते गरीब मुलांच्या शिक्षणासाठी केला.


       १९९८ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर कल्यांसूंदरम यांनी “पालम” नावाची सामाजिक संस्था सुरू केली या संस्थेद्वारे गरीब मुलांच्या शिक्षणासाठी ते मदत करतात. त्यांच्या या कार्याची दखल कधी कोणत्याही सरकारने घेतली नाही की कधी ते बातम्या मध्ये दिसले नाहीत पण जे भारत सरकारला दिसले नाही ते युनो आणि अमेरिकेला दिसले त्यांनी कल्यान सुंदरम यांना “MAN OF THE MILLENNIUM “ हा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला एवढेच नाही तर अमेरिकेतील एका सामजिक संस्थेने त्यांना ३० कोटी रुपये एवढी मोठी रक्कम बक्षीस म्हणून दिली पण कल्याण सुंदरम यांनी तेही दान करून टाकले.


      एवढे विरक्त व्यक्तिमत्व आजच्या युगात कुठे पाहायला मिळते का ? मोठ मोठे क्रिकेटर, अभिनेते ज्यांच्या एका फोटोसाठी मागेपुढे करणारे हे मीडियावाले अशा व्यक्तींची मुलाखत तरी कधी घेतात काय ? शिक्षण संस्थांच्या नावाखाली शिक्षणाचे व्यापारीकरण करणारे मोठमोठी महाविद्यालये काढतात पण याच महाविद्यालयामध्ये गरीब आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार देतात या सर्वांनी कल्याण सुंदरम यांच्या जीवनाकडे एक आदर्श म्हणून बघावे असे मला तरी वाटते.

2 thoughts on “कलियुगातील कर्ण – पालम कल्याणसुंदरम”

Leave a Comment