पृथ्वीचा बहुतांश भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वीवर, दामुद्र,नद्या,विहिरी,बर्फ,हिमसरोवरे यात पृथ्वीच्या सुमारे ७१ % पाणी आहे, तरीही मानवाला पिण्यायोग्य पाणी हे फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे. जर पृथ्वीवर एवढे पाणी आहे तर मग पिण्यासाठी एवढेच पाणी का ? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्यातल्या त्यात जे पाणी पिण्यायोग्य आहे ते सुद्धा दिवसेंदिवस दुषित होऊन पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट जगासमोर उभे आहे.
जलप्रदूषण म्हणजे काय ?
पाण्याच्या चांगल्या स्रोतामध्ये प्रदूषित पाणी, प्रदूषके, इत्यादिंचा कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता सोडल्यामुळे पाण्याची गुणवत्ता खराब होण्याला ‘जलप्रदूषण’ असे म्हणतात.
जलप्रदूषण होण्याची कारणे कोणती ?
कारखान्यातील दूषित पाणी, शहरातील सांडपाणी हे प्रक्रिया न करता तसेच नदी , तलाव यामध्ये सोडले जाते त्यामुळे त्याच्यातील विषारी रसायने पाण्यात मिसळतात व पाण्याचे स्रोत दूषित होतात.
भूपृष्ठावर उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या स्रोतांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, टायर, खराब झालेले अन्न इ. गोष्टी सर्रासपणे नदीपात्रात फेकल्या जातात. नद्यांचे प्रदूषण होण्याचे दुसरे मोठे कारण म्हणजे
धार्मिकतेच्या नावाखाली होणारे नद्यांचे प्रदूषण, मंदिरातील निर्माल्य कचरा, फुले, पिंड दानाच्या वेळी तयार होणारा कचरा सर्व नदी पात्रात टाकला जातो, नदीकिनाऱ्याजवळ अंघोळ करून जुनी कपडे नदीत सोडली जातात, यामुळे नदीपात्रांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.
गावामध्ये कपडे धुणे, भांडी धुणे , जनावरांना पाण्यात अंघोळ घालणे यामुळे नदी, विहिरी यातील पाणी दूषित होते. नदीकाठी असणाऱ्या घरांमधून निघणारा सर्व कचरा, सांडपाणी ,खरकटे,सर्व नदीच्या पाण्यात सोडले जाते यामुळे नदीचे पात्र प्रदूषित होते .
जलप्रदूषनाचे दुष्परिणाम :
पाणी प्रदूषित आहे कि चांगले आहे हे ओळखणे काही वेळ पटकन शक्य होत नाही जर अशा पाण्यात विषारी द्रव्ये मिसळली असतील तर अशावेळी मानवी आरोग्यावर त्याचा खूपच गंभीर परिणाम होतो.
त्याचबरोबर पाण्यात राहणारे जलचर ते पाणी पिणारे जाणारे यांना मृत्यूचा धोका संभवतो.
या पाण्याचे दुष्परिणाम शेतीमालावर सुद्धा दिसून येतात दुषित पाण्यामुळे भाजीपाल्यांची गुणवत्ता खराब होते. अशा भाज्यांमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतात. समुद्रकिनारे दुषित झाल्याने समुद्रातील मासेमारीवर परिणाम होतो, समुद्रात नैसर्गिक तेलाचे उत्खनन करताना तेलाचे तवंग पाण्यावर तयार होतात त्यामुळे प्रवाळ व मासे यांना धोका निर्माण होतो.
उपाय योजना :
संपूर्ण जगभरात जलप्रदूषण रोखण्यासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. अमेरिकेमध्ये 1972 मध्ये स्वच्छ जल कायदा आणि 1 9 74 सुरक्षित पेय जल कायदा लागू केला गेला त्यामुळे भूपृष्ठ जलाचे प्रदूषण रोखण्यासाठी मदत झाली.
कारखाने, शहरातील गटारी , नाले यांचे पाणी नदीपात्रात सोडण्यापूर्वी त्याच्यावर प्रक्रिया करूनच ते पाणी नदीपात्रात सोडावे यामुळे नदीपात्र दुषित होणार नाहीत.
वायू प्रदुषण म्हणजे काय ?
https://bit.ly/33ZF8DO