राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ | National Curriculam Framework 2005 (NCF 2005)

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ | National Curriculam Framework 2005 (NCF 2005)

 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, २००५ ची पार्श्वभूमी :

 सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सर्वात पहिले पाऊल म्हणजे एन.सी.ई.आर.टी. ने प्रा. यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुकाणू समितीची स्थापना केली. ३५ सदस्यीय सुकाणू समितीमध्ये विविध शाखांतील तज्ज्ञ, क्षेत्रातील प्राचार्य, शिक्षक, सी.बी.एस.ई. (C.B.S.E.) चे अध्यक्ष, मान्यवर अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी आणि एन.सी. ई.आर.टी. चे सदस्य यांचा समावेश होता. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा तयार करण्याचे कार्य सुकाणू समितीवर सोपविण्यात आले. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ अशा २१ मंडळांनी अभ्यास करून केलेल्या शिफारशींवर चर्चा करण्याचे कार्य सुकाणू समितीने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याअगोदर करावे असे अपेक्षिलेले होते. या मंडळांनी अभ्यासक्रमाच्या प्रवाहाच्या मुख्य क्षेत्रांचा विचार केला, त्यात अभ्यासक्रमाची व्याप्ती, रचनात्मक पुनर्रचनेची व्याप्ती, राष्ट्रीय प्रवाह हे प्रमुख घटक विचारात घेण्यात आले.


 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ ची प्रमुख तत्वे 

1. ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडणे 

२. घोकंपट्टीतून शिक्षणाची सुटका करणे.

३. शिक्षण पाठ्यपुस्तक केंद्रित न राहता मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी त्याचा उपयोग होणे.

४. परीक्षा जास्त लवचिक करून त्यांना वर्गातील जीवनाशी एकात्म करणे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *