शैक्षणिक व्यवस्थापनाचे प्रकार कोणते ?
वेळ व्यवस्थापन म्हणजे काय ?
आजच्या धावपळीच्या धकाधकीच्या व गतिमान युगात वेळेला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे.
“सभोवती उपलब्ध असलेल्या साधनस्त्रोतांद्वारे काही प्राप्त करण्यासाठीच्या कार्यात लागणाऱ्या वेळेचा परिणामकारक वापर म्हणजे वेळ व्यवस्थापन होय.”
अशी वेळ व्यवस्थापनाची सर्वसाधारण व्याख्या केली जाते. आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व कळल्याशिवाय आपण त्याचा वापर करू शकत नाही.
त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन आपण कशासाठी करावे? त्याचे फायदे काय आहेत? त्याचा कुठे आणि कसा उपयोग केला जातो? अशा प्रकारचे प्रश्न तेव्हाच निर्माण होऊ शकतात, जेव्हा आपल्याला वेळेचे आणि आपल्या जीवनातील तिच्या स्थानाचे महत्त्व माहीत असते.
शैक्षणिक व्यवस्थापनाचे प्रकार व वेळ व्यवस्थापनाचा अर्थ
वेळेचे व्यवस्थापन म्हणजे उत्पादकता किंवा कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने एखाद्या विशिष्ट कृतीवर किंवा उपक्रमावर किती वेळ खर्च करावयाचा आहे यावर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया किंवा कृती होय.
सुरुवातीच्या काळात वेळेचे व्यवस्थापन फक्त व्यवसाय किंवा कामाशी संबंधित असे; परंतु हळूहळू या संकल्पनेचा विस्तार होत गेला आणि आता त्यामध्ये वैयक्तिक कामकाजाचा किंवा उपक्रमांचाही समावेश होतो.
वेळेची व्यवस्थापन प्रणाली ही विविध प्रक्रिया, साधने, तंत्रे आणि पद्धतींचा संयोग आहे. कोणत्याही प्रकल्प विकासात वेळेचे व्यवस्थापन गरजेचे असते कारण त्यावरच प्रकल्पाची व्याप्ती आणि पूर्णत्व अवलंबून असते.
वेळेचे व्यवस्थापन हे प्रत्येक कामासाठी कशा प्रकारे वेळ विभागून देतो यावर अवलंबून असते. वेळेचे व्यवस्थापन केल्याने वेळेचा उपयोग अधिक उत्पादक कामांसाठी केला जातो. तेवढ्याच वेळेत अधिक काम केले जाते. वेळेचे व्यवस्थापन म्हणजे स्वयं व्यवस्थापन होय.
शिक्षकांनी वेळेचे व्यवस्थापन कसे करावे ?
आपल्या कार्याचे योग्य वेळेनुसार व्यवस्थापन करण्याचे कौशल्य शिक्षकांमध्ये असणे आवश्यक आहे. दीर्घकालीन शैक्षणिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना वर्ग, विद्यार्थ्यांसंदर्भात आवश्यक असणाऱ्या तात्कालिक शैक्षणिक गरजा आणि इतर शैक्षणिक कार्य यांमध्ये योग्य प्रकारे संतुलन राखणे गरजेचे असते.
पाठनियोजन श्रेणीपद्धत परीक्षा आणि प्रत्यक्ष अध्यापन हे कार्य शिक्षकांच्या वेळेच्या चौकटीनुसार तयार करतात. विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करण्याकरिता वेळापत्रकानुसार तासिका या फार कमी प्रमाणात असतात.
तरीही दिलेल्या वेळेचे व्यवस्थापन शिक्षकांनी कौशल्यपूर्ण आणि योग्य प्रकारे केले तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल.
१. शिक्षकांनी दैनंदिन कार्याची मांडणी
२. गृह्कार्य व स्वाध्याय विषयक योजनाबद्ध आयोजन
३. संभाव्य अडचणी / समस्यांचे नियोजन
४. वैयक्तिक वेळेचे नियोजन :
शिक्षणातील वेळ व्यवस्थापनाची गरज ?
आपल्या कार्यक्षमतेला सुनियोजित वेळापत्रकाची साथ मिळाली तर उपलब्ध वेळेचा समर्पक उपयोग करून आपण योग्य परिणाम साधून आपल्या उत्पादकतेत, क्रियांमध्ये वृद्धी पडवून आणू शकतो. शिक्षण क्षेत्रातही वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक असते. विशेषतः परीक्षेच्या कालखंडात वेळेचे योग्य नियोजन करून त्याचा वापर करणे जरूरीचे असते. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यात होतो. तेव्हा विद्याथ्र्यांना वेळेचे महत्त्व समजते.
शिक्षण काळात विध्यार्थ्यांना मिळणाऱ्या एकूण वेळेचे नियोजन करून त्याचा सदुपयोग करणे, शिक्षण प्रणालीमध्ये वेळेनुसार शिक्षण क्रियांचा आराखडा तयार केला जातो. यामध्ये मर्यादित वेळ असतो व त्यानुसार वेळापत्रकाचे नियोजन केले जाते. विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने व शैक्षणिक ध्येये व उद्दिष्टांच्या पूर्ती हेतूने मर्यादित वेळेचा सदुपयोग करणे आवश्यक असते. काही शैक्षणिक संस्थांमध्ये सकाळ, दुपार अशा सत्रात वर्ग चालविले जातात. अशातच घड्याळी सहा तासिकांमध्ये सर्व शैक्षणिक क्रियांचा समावेश करावयाचा असतो. या सर्व क्रियांचा विचार करून मर्यादित उपलब्ध वेळेनुसार तासिकांचे योग्य नियोजन करणे आवश्यक असते.
संदर्भ : शालेय शिक्षणाची गुणवत्ता आणि व्यवस्थापन (सक्सेस पब्लिकेशन )